MSG
ही कविता राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनासाठी , श्री बबलू वडार
(शिक्षक -कोल्हापूर) यांनी लिहिली होती. कविता पठण स्पर्धेत त्यांना
पहिला नंबर मिळाला.
Out dated झालंय आयुष्य
स्वप्नही download होत नाही
संवेदनांना 'virus' लागलाय
दु:खं send करता येत नाही
जुने पावसाळे उडून गेलेत
delete झालेल्या file सारखे
अन घर आता शांत असतं
range नसलेया mobile सारखे
hang झालेय PC सारखी
मातीची स्थिती वाईट
जाती माती जोडणारी
कुठेच नाही website
एकविसाव्या शतकातली
पीढी भलतीच 'cute'
contact list वाढत गेली
संवाद झाले mute
computer च्या chip सारखा
माणूस मनानं खुजा झालाय
अन 'mother' नावाचा board,
त्याच्या आयुष्यातून वजा झालाय
floppy Disk Drive मध्ये
आता संस्कारांनाच जागा नाही
अन फाटली मनं सांधणारा
internet वर धागा नाही
विज्ञानाच्या गुलामगिरीत
केवढी मोठी चूक
रक्ताच्या नात्यांनाही
आता लागते WhatsApp आणी facebook................
Very nice poem, which discribes real modern life...
0 comments:
Post a Comment