MSG
पोलीस बांधवांचे चुकीच्या मानसिकतेने मुल्यमापन करणा-या अबोध समाज बांधवांसाठी..,
सप्रेम..........,,,
समाजाचा आरसा असलेले पोलीस दल,
समाज व्यवस्थेचा आधारस्तंभ असलेले पोलीस,
पण तेवढेच दुर्लक्षित आणि शोषित म्हणजे पोलीस...!!
जो समाज स्वतः भ्रष्टाचाराचे समर्थन करतो,
ज्यांना देशात अब्जावधीचा घोटाळा मामुली वाटतो,
१२वी पास पोलीस पाहिजे आणि अंगठा छाप, गुन्हेगारी पार्श्वभूमिचे मंत्री चालतात,
असा समाज हातावर पोट घेउन जगणा-या पोलीसाकडुन
SUPERHERO च्या अपेक्षा करतात तरी कसे..?
भल्या बु-याची जाण आम्हालाही आहे, पण पोलीस म्हणजे दात आणि नखे काढुन घेतलेला वाघ,
चावणार ही नाही आणि ओरबाडणार ही नाही..!
जसा नेता तसा समाज आणि जसा समाज तसा पोलीस,
मग प्रश्न येतो की यावर उपाय काय..?
उत्तर एकच समाजाने स्वतः ला बदलायला हवे मग नेता आणि पोलीस आपोआपच सुधारतील.! पैसा आणि सत्ता मिळाली की ताकत वाढते हे बाळकडु समाजच शिकवतो,
आणि मग एक नेता या बाळकडुचे पांग फेडतो,
त्यासाठी तो शक्ति प्रदर्शन करतो,
अर्थात पैशाचा वापर यासाठी केला जातो.
विचार करा मोठे घोटाळे होतात, विरोधी पक्ष बोंबलतो, सत्ताधारी सारवासारव करतो, मग पडद्याआड मांडवली होते. लवासा, आदर्श, सिंचन, साखर कारखाने, शासकीय भूखंड, कोळसा, शेतकरी आत्महत्या असे अनेक घोटाळे होतात, हे सर्व तुम्ही समाज म्हणुन विसरता आणि आम्ही पोलीस म्हणुन लाचार असतो.सांगणार तरी कोणाला सिग्नल तोडणारे, रस्त्यावर थुंकणारे, प्रत्येक मिनिटाला कायदा तोड़णारे आणि शिक्षेपासुन वाचण्यासाठी लाच देणारे किंवा नेत्याची शिफारस आणणारे तुम्हीच असता ना..?
जन्मापासुन मरेपर्यंत पोलीसाला पर्याय नाही, बघा १५ मिनिट सुध्दा पोलीस दल संपावर गेले तर काय होईल, हि धमकी मुळीच नाही,
एक कळकळीची विनंती आहे.
ज्या झाडावर बसला आहात त्याची मुळे उपटु नका..!
.... मी एक पोलिस
0 comments:
Post a Comment