GOOD THOUGHT

सांयकाळी समुद्रकाठी फ़िरताना एक वृद्धानं ,,,एका लहानग्याला किनार्यावर काहीतरी उचलून समुद्रात फ़ेकताना पाहिल
आश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ गेला तर तो समुद्राकाठचे तडफ़डणारे तारामासे एक-एक करुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात फ़ेकत होता..न राहावून त्यानं लहानग्याला विचारलं,"समुद्रकिनारी इतके हजारो मासे आहेत,तु कुणा कुणाला वाचवू शकणार आहेस ??..मुठभर मासे वाचवून जगाला असा काय फ़रक पडणार आहे?."त्या मुलाने आणखी एक मासा समुद्रात फ़ेकत निरागसपणे उत्तर दिलं,"यानं जगाला काय फ़रक पडेल ते माहीत नाही.पण या माशाला विचारा,"त्याला काय फ़रक पडला ?"ज्याचा मी नुकताच जीव वाचवला.....आयुष्य असचं जगायचं असत कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं,स्वत च्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचे असतं.��
रात्र नाही स्वप्न बदलते
दिवा नाही वात बदलते मनात
नेहमी जिंकण्याची आशा असावी . कारण
नशीब बदलो ना बदलो.. पण वेळ नक्कीच
बदलते. . . . . .

Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

Blog Archive

Powered by Blogger.

Recent

Comment

NEXT PAGE

FOR NEXT PAGE CLICK ON OLDER POSTS.

Search This Blog