GOOD THOUGHT

पैसे नसतात तेव्हा माणूस
झाडपाला खाऊन दिवस काढतो
पैसा आल्यावर
हाच झाडपाला सलाड म्हणून हॉटेला त खातो 

पैसे नसतात तेव्हा
माणूस सायकलने रपेट करतो,
पैसा आल्यावर मात्र
हीच सायकल तो जिममध्ये व्यायामासाठी चालवतो.

पैसे नसतात तेव्हा
रोजीरोटीसाठी त्याची पायपीट
चालू असते.
पैसे आल्यावर मात्र
हीच पायपीट तो चरबी कमी करण्यासाठी करतो.

माणूस स्वत:शीच प्रतारणा करीत असतो.
पत नसली तरी
लग्न करायला एका पायावर तयार असतो,
ऐपत असली की मात्र
त्याला घटस्फोट हवा असतो.

पैसे वाचवायला
तो कधी बायकोलाच आपली सेक्रेटरी बनवितो,
पुढे पैसा आला की
सेक्रेटरीलाच बायको सारखे वापरतो.

पैसे नसेल तेव्हा
तो असल्याचे सोंग आणतो,
पैसा असतो तेव्हा मात्र
कंगाल असल्याचे नाटक करतो.

पैसे नसतात तेंव्हा
मिठाई खावीशी वाटते 
पैसे आल्यावर 
मधुमेहा मुळे खाता येत नाही.  

पैसे नसतात तेंव्हा
भूक लागते , झोप येते
पैसे आल्यावर
दोन्हीसाठी औषध घ्यावे लागते 
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
माणसा रे माणसा...
तू वास्तव तरी कधी स्वीकारतोस?
आपल्या सावली पासून आपणच शिकावे
कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे
शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत
म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे ॥
                !!!!!!!!
मला माणसे जोडायला आवडतात,
माणसांशी नाती जोडायला आवडतात
जोडलेली नाती जपायला आवडतात,
कारण
माझा विश्वास आहे की, माझ्या मृत्यूनंतर
मी कमावलेली संपत्ती
मी माझ्याबरोबर घेऊन जाणार नाही,
परंतु
मी जोडलेल्या माझ्या माणसांच्या डोळ्यांतील
अश्रूंचा एक थेंब हाच
माझ्याकरिता लाखमोलाचा दागिना आणि हीच
माझी माझ्या आयुष्यातीलॊ खरी कमाई
असेल...
तुमचे आणि माझे हे नाते
माझ्यासाठी अनमोल आहे ...
आज प्रत्येकजन आपली गाडी झाडाच्या सावलीत
लावायची खटपट
करतो,
.
.
.
.
.
पण लहानस रोपट लावण्याची खटपट कुणीच करत
नाही..!

आवडल तर पुढे पाठवा....������

Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

Blog Archive

Powered by Blogger.

Recent

Comment

NEXT PAGE

FOR NEXT PAGE CLICK ON OLDER POSTS.

Search This Blog