JOKS

बंड्या (डॉक्टरले) : डॉक्टर, लई उसन भरली हाय
कमरेत.
डॉक्टर: का झालं बे?
बंड्या: काई नाई डॉक्टर सायब. आज सकाडीच
कारखान्यातून नाईट शिफ्ट करून रोजपेक्षा थोडं
लवकरघरी आलो.
बायकोन दरवाजा उघडला. आनं पायतो त का?
घरच्या बाल्कनीचा दरवाजा खुलाच.
तसाच धावत धावत बाल्कनीत गेलो त खाली यक
माणूस शर्टची बटनं लावत धावताना दिसला.
मावा दिमाकच खराब झाला नं, तशीच किचन
मंदली फ्रीज उचलली आनं मारलीनं त्या मानसाले
फेकून.
च्या मायला लईच उसन भरली कमरेत.
डॉक्टर: या गोड्या घ्या वाटण बर लवकरच.
नेक्स्ट....
(दुसरा पेशंट आत येतो)
डॉक्टर: तुमाले का झालं?
पेशंट: का सांगू तुमाले डॉक्टर.
सकाडी सकाडी लईच आयटम झाला.
आज पासून एका जागी कामाले जाणार होतो.
सकाडी लवकर उठाची सवय नोवती.
आनं आलाराम वाजूनबी जाग नाई आली. मनून
गडबडीत कामालेजात होतो. त
वरच्या एका माणसान फ्रीजच फेकून मारली नं.
सायब कामाचं रायलं जागेवरच. आनं हे
दुकण्याची बी मागं लागली.
डॉक्टर: हे औषद घ्या. वाटन लवकर बरं.
नेक्स्ट....
(दुसरा पेशंट आत येतो.)
डॉक्टर: का झालं?
पेशंट: काई नाई डॉक्टर. माई लवर हाय नं. काल
रात्री तिले भेटाले गेलो होतो.
सकाडी सकाडी तिचा नवरा आला लवकर. मंग
का करणार?
लपलो फ्रीजमधी. त त्या बैताड मानसान फ्रीजच
फेकून देली वरच्या मजल्या वरून खाली.
डोक्स लईच दुकून रायलं सायेब.
डॉक्टर: लईच जांगळगुत्ता दिसून रायला बे.....
������������������

Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

Blog Archive

Powered by Blogger.

Recent

Comment

NEXT PAGE

FOR NEXT PAGE CLICK ON OLDER POSTS.

Search This Blog