NILA WADAL

एकदा असे घडले..........
सिद्धार्थ कॉलेजच्या आनंद भवनात बाबासाहेबांनी
कार्य कर्त्यांची एक गुप्त बैठक बोलावली होती.
सुशिक्षित तरुण कार्यकर्ते व जुने अशिक्षित कार्यकर्ते
यांच्यात चालू असलेला बेबनाव , एकमेकांचे हेवेदावे ,
जुन्यांना अशिक्षित आहेत ,म्हणून मान न देणे , त्यांच्या
आज्ञा न पाळणे इत्यादी बाबींवर बाबासाहेबांनी तरुण
सुशिक्षितांना समज देण्याकरिता बैठक बोलावली होती.
अर्थात त्या बैठकीस पत्रकारांना तसेच इतरांना मज्जाव होता.

बैठक ऐन रंगात आली असतांना दारावर गोंधळ , बाचाबाची
होत असल्याचे बाबा साहेबांच्या लक्षा­त आले. त्यांनी दारावर
पहाऱ्या करिता उभ्या असलेल्या बालमकडे विचारणा केली.
बालम बाहेर आवाज कसला होत आहे'?

बाबा ! एका माणूस गावाकडून आला आहे. ' तो तुम्हांला
भेटायची परवानगी मागतोय मी त्याला अनेक वेळा घालवले
परंतु तो ऐकतच नाही . बाहेर दुसरा तिसरा कसलाही
गोंधळ नाही .त्याची बडबड चालू आहे कि, मला बाबांना भेटायचं
तो एकटाच आहे कि अनेक लोक आहेत ?
बाबा ! तो एकटाच आहे मग त्याला आत पाठव आणि
दरवाजा बंद कर .मळकी पैरण , फाटक धोतर नेसलेला
दाढीचे खुंट वाढलेला , चेहरा उन्हाने रापलेला, एक मध्यम
वयीन मजबूत बांध्याचा, हातात एक गठूड घेतलेला
गृहस्थ दरवाजा उघडता क्षणी तीरा सारखा बैठकीच्या
खोलीत घुसला . सरळ बाबा साहेबांच्या पायाव­र त्याने
आपले डोके ठेवले आणि दोन्ही हातांनी बाबासाहेबांचे
पाय घट्ट धरले. बाबासाहेबांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न
केला परंतु तो त्यांच्या पायावरच बेशुद्ध झाला होता.
धावा धाव झाली. त्याच्या तोंडावर पाणी मारले गेले.
बाबासाहेबांनी त्याला स्वतः आपल्या हातानेपाणी पाजले .

तो गृहस्थ सावध झाल्यानंतर बाबासाहेबांनी त्याला विचारले,
कोठूनआलास ? गावावरून. कोणत्या गावावरून ? साताऱ्याहून.
कधी आलास ? हा आताच बोरीबंदर ठेसनातन तुमच्याकड आलोय.
कधी गावावरून निघालास ? एक महिनाझाला.
एक महिना झाला ? मग एक महिना काय करत होतास ?
बाबा मी एक महिन्यापासन रेल्वेच्या लाईनी-लाईनीने चालत
तुमच्या पायाजवळ आलोय .
तू महिनाभर काय खाल्लस ?त्या गृहस्थाने सोबत आणलेले
गाठोडे सोडले, तर त्यात बाजरीच्या वाळक्या भाकरीचे तुकडे होते.
बाबा मी ह्या भाकरी , ह्या कांदा चटणी बराबर जिथं दमत होतो
तिथं थांबून खात होतो .
ह्या भाकरी तर वाळलेल्या आहेत! बाबा , ह्या पाण्यात भिजल्या
तर मऊ सुद होत्यात. त्याच मी महिनाभर खात होतो.
हे सर्व ऐकल्यावर बाबासाहेबांचे डोळे भरून आले.
त्याला तसाच जवळ घेऊन बाबासाहेब कडाडले......

सुशिक्षित मूर्खांनो ! मी तुमच्यासाठी खूप काही केले आहे.
तरी तुम्ही घरांकरिता , पैशाकरिता , पदाकरिता भांडत आहात.
या माझ्या दिन-दुबळ्या ,मुक्या जनते करिता मला अजून खूप
काही करायचे आहे . माझ्या नंतर यांचे तुम्ही काय हाल
कराल कोण जाणे ? आणि हीच चिंतामला रात्रंदिवस
सतावत आहे. हे अशिक्षित गरीब आहेत पण लाचार नाहीत.
इमानी आहेत, पण गद्दार नाहीत . चला उठा बैठक संपली
असे समजा . याची दैनावस्था पाहून मला एकट्यालाच
त्याच्यावर आलेले संकट दूर करावे लागेल.आणि
अशा सुन्न वातावरणात ती बैठक संपली.

Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

Blog Archive

Powered by Blogger.

Recent

Comment

NEXT PAGE

FOR NEXT PAGE CLICK ON OLDER POSTS.

Search This Blog