GOOD THOUGHT
विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखालीबसावं.
समोरचं एक विंचू दिसावा.
त्याला मारण्यासाठी दगड उचलावा.
दगडाखालून साप निघावा.
त्याने आपला पाठलाग करावा.
पळताना ठेच लागून विहीरीत पडावं.
विहीरीत मोठी मगर असावी.
तिने वेग घेण्यापूर्वी,
एखाद्या फांदीचा वेध घ्यावा.
वर येण्याचा प्रयत्न करावा.
वरती भूकेला वाघ असावा.
त्याच्या भितीने फांदीचा हात सुटावा.
फांदीवरील मधमाशांनी भडका करावा.
आणि...
अशा अवस्थेत
मधाच्या पोळीतून पडणारा,
मधाचा एक थेंब
तोंडाने झेलण्याचा प्रयत्न करावा.
यालाच 'जीवन' म्हणतात.......
बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपे असत..!!
जगायला गेलं तर
दु:खातही सुख असत..!!
चालायला गेलं तर
निखारेही फूले होतात..!!
तोंड देता आले तर
संकटही शुल्लक असत..!!
वाटायला गेलं तर
अश्रूंतही समाधान असत..!!
पचवायला गेलं तर
अपयशही सोपे असत...!!
हसायला गेल तर
रडणेही आपल असत .....!!
बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपे असत..
बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठं
माहीत असतं ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द न्
शब्द कोरला जातो.......
_____________________________
_____________________________
जीवनात नाती तशी अनेकच असतात,
काही नाती असतात, न
जोडता सुद्धा टिकणारी,
तर काही जोडून सुद्धा तुटणारी जीवनात
नाती तशी अनेकच असतात
म्हणुनच म्हणतात ना " हे जीवन एक रहस्य
आहे, तिथे सर्व काही लपवावं लागतं
मनात कितीही दुःख असले,
तरीजगा समोर हसावं लागतं....
_____________________________
_____________________________
तुटलेली फूले सुगंध देऊन जातात,
गेलेली शान आठवणी देऊन जातात...
प्रत्येकाचे अंदाज वेगवेगळे असतात म्हणुन
काही माणसे क्षणभर तर काही आयुष्यभर
लक्षात राहतात....
_____________________________
_____________________________
काही माणसं मैञीने खांदयावर हात
टाकतात. दुःखात ही कायम साथ देतात.
काही माणसं
गजबजलेल्या शहरा सारखी असतात.
गरज पडली तरच आपला विचार करतात.
बाकीच्या वेळी ते
सगळी नाती विसरतात.
माञ काही माणसं
पिँपळाच्या पानासारखी असतात.
जाळी झाली तरी मनाच्या पुस्तकात
आयुष्यभर जपुन ठेवतात…..
_____________________________
_____________________________
आयुष्यात प्रत्येक
गोष्टीला दुसरी बाजू असते,
आणि
आयुष्यात अशी काही माणस
असतात .....
ज्यांची जागा दुसरं कुणीचं घेऊ शकत
नाही,
आयुष्यात कितीही माणसं येऊ देत
ते नेहमीचं
Special असतात आणि राहतात...
_______________
____________ ___________________________
एखाद्याला आपले महत्व पटवुन द्यायचे असेल
तर त्याच्या पासुन थोडे दूर रहा,
आणि तुमची उणीव जाणवुन द्या.... पण
इतका वेळही दूर
नको की ती व्यक्ति तुमच्याशिवाय
जगायला शिकुन जाईल... _______________
____________ ___________________________
जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु
नका... 1) विश्वास 2) वचन 3) नाते 4)
मैत्री 5) प्रेम . कारण
या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही..
परंतु वेदना खुप होतात... _______________
____________ ___________________________
जिवनातले तीन छोटे नियम- १ . तुम्हा जे
हवं आहे ते मिळवण्यासाठी तुम्ही जर
प्रयत्नचं केले नाहीतर ते तुम्हाला कधीच
मिळणार नाही........... २ . तुमच्या मनात
असलेले तुम्ही जर कधी विचारले
नाहीकिंवा बोलले नाही तर त्याचेउत्तर
नेहमीचं नाही असेचं असेल ...... ३ . जर
तुम्ही पुढे जाण्यासाठी पाउल उचललेचं
नाही तर तुम्ही जागेवरचं रहाणार...
___________________________ _______________
____________
असे म्हणतात...
हृदय हे जगातील सर्वात मोठेसुंदर मंदिर आहे "
हसणाऱ्या चेहऱ्यावर विश्वास
ठेवण्यापेक्षा ...,
हसणाऱ्या हृदयावर
विश्वास ठेवावा " कारण असे हृदय फारच कमी लोकांजवळ असते ..
___________________________ _______________
____________
....आठवण.....
तिच कामच आहे
आठवत राहणे...
ती कधी वेळ काळ बघत
नाही...
तिला वाटते तेव्हा येऊन जाते...
कधी हसवते तर कधी रडवुन जाते...
___________________________ _______________
____________
जो माणुस सगळ्यांना खुश ठेवत
असतो .
जो माणुस सगळ्यांची काळजी घेतअसतो..
तोच माणुस स्वताच्या जीवनामध्ये स्वताला एकटा समजत असतो...
___________________________ _______________
____________
आठवणी येतात...
आठवणी बोलतात...
आठवणी हसवतात...
आठवणी रडवतात...
अनं काहीच न
बोलता आठवणी निघून जातात...
तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात
0 comments:
Post a Comment