NILA WADAL
भीम म्हणजे क्रांति ,
भीम म्हणजे उत्क्रांति,
भीम म्हणजे गति ,
भीम म्हणजे प्रगति ,
भीम म्हणजे
नव्या जगण्याची निति .........,
भीम म्हणजे विद्रोह ,
भीम म्हणजे सत्याग्रह ,
भीम म्हणजे संघर्ष ,
भीम म्हणजे उत्कर्ष ,
भीम म्हणजे मानवाच्या
स्वभिमानाचा अर्थ ......,
भीम म्हणजे माता ,
भीम म्हणजे पिता ,
भीम म्हणजे एकता ,
भीम म्हणजे समता ,
भीम म्हणजे हरलेल्या
मनाना जिंकविनारा विजेता ...,
भीम म्हणजे साधना ,
भीम म्हणजे धारणा ,
भीम म्हणजे भावना ,
भीम म्हणजे प्रेरणा ,
भीम म्हणजे तथागाथांची
प्रबुद्ध करुणा ...,
असा भीम ,
भीम म्हणजे सर्वकाही,
सारा सारा भरलेला ,
दु:खी ,कमजोर खचलेल्या ,
मना मध्ये सुप्तपणे निजलेला ...
पुन्हा एकदा जागवावा
रक्ता रक्तात पेटवावा..
निधड्या छातीत उभारावा ....
नव्या जोमाने नव्या ताकदीने,
भीम ,तुझ्या माझा सर्वांच्या रक्तातात जागवावा ..
भीम प्रणेता ..!
समाजिक क्रांतीच्या महासुर्यांना
विनम्र अभिवादन.!
....
0 comments:
Post a Comment