MSG

बायको म्हणजे देवाने घडवलेले अप्रतीम यंत्र...!v
सकाळच्या गजराबरोबर सेवेस हजर,
पेस्ट आणि ब्रश दिसेल, पहिले जिथे जाईल नजर,
गरम पाणी, श्यांपु, टॉवेल, साबण, असेल सुसज्ज बाथरुम,
अंगातल्या कपड्याबरोबर चहा असेल हजर,
असंच असतं रोज सकाळचं सत्र..!

बायको म्हणजे देवाने घडवलेले अप्रतीम यंत्र...!

ऑफीसला जातांना गरमागरम डबा, आणि गोड मुका,
संध्याकाळी परत स्वागत, घालून पोटात दिवसभरच्या चुका,
हातातली बॅग टेबलावर जाते, संध्याकाळच्या चहा बरोबर,
'अहो ऐकले का' म्हणून ऐकू येतात गोड गोड हाका,
तिच जाणो तिचे हे अजब तंत्र..!

बायको म्हणजे देवाने घडलेले अप्रतीम यंत्र...!‌

रुचकर जेवणा बरोबर गप्पांची फोडणी असते,
डोळा लागे पर्यंत भांड्याशी तीचे युद्ध सुरुच असते,
सगळ्या घरावर शेवटचा हात मारुन,
पदराला हात पुसत गालात खुदकन हसते,आणि
कानात पुटपुटते प्रेमाचा मंत्र..!

बायको म्हणजे देवाने घडलेले अप्रतीम यंत्र..
जेवले का हो.. म्हणून आठवण करून देणारे,
मनातल्या भावना लगेच जाणून घेणारे,
जीवनाच्या वाटेवर ऊन असो वा सावली,

नेहमीच सोबत देणारे, आधार होणारे,
असे आहे बायको नावाचे यंत्र...!

तेव्हा आदर करा बायकोचा..!
Fakt. स्वत:च्या............

Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

Blog Archive

Powered by Blogger.

Recent

Comment

NEXT PAGE

FOR NEXT PAGE CLICK ON OLDER POSTS.

Search This Blog