MSG

��
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नका
सोय म्हणून सहज असं तोडू नका
रक्ताचं नाही म्हणून,
कवडीमोल ठरवू नका..
��
भावनांचं मोल जाणा ,
मोठेपणात हरवू नका.
आयुष्याच्या प्रत्येक वळणात
नवं नातं जुळत असतं,
��
जन्मभर पुरेल इतकं भरून
प्रेम मिळत असतं,
तुम्ही फक्त ओंजळ पुढे
करुन पहा,
��
कमीपणा मानू नका,
व्यवहारातलं देणं घेणं
फक्तं मध्ये आणू नका..
मिळेल तितकं घेत रहा,
जमेल तितकं देत रहा,
��
समाधानात तडजोड असते
फक्त जरा समजून घ्या
'नातं ' म्हणजे ओझं नाही,
मनापासून उमजून घ्या..
��
विश्वासाचे चार शब्दं ..
दुसरं काही देऊ नका
जाणीवपूर्वक 'नातं' जपा..
मध्येच माघार घेऊ नका...
�� .
शब्दांना  भावरूप  देते,
. . .  तेच  खरे  पत्र ॥
नात्यांना  जोडून  ठेवते,
      तेच  खरे  गोत्र ॥
नजरे  पल्याड  पाहू  शकतात  तेच,
       खरे  नेत्र ॥
दूर  असूनही  दुरावत  नाही,
       तेच  खरे  मित्र. ॥॥

Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

Blog Archive

Powered by Blogger.

Recent

Comment

NEXT PAGE

FOR NEXT PAGE CLICK ON OLDER POSTS.

Search This Blog