MSG
वास्तुशास्त्र ⛪
......................... ......................
नव्या घराचा पाया भरतांना
तो दिसला मला, माझ्याकडे येतांना
येताच म्हणाला.......
मी वास्तुशास्त्र जाणतो
कुठे बेड, कुठे हाॅल....
कुठे किचन असावं सांगतो
शास्त्र माझे सर्व काही सांगते
मी सांगेन तिथेच सुख नांदते...
ऐकून त्याचा सारा कित्ता
मी म्हणालो, दोस्ता थोडं थांब
अन्
मला तिथल्या सुखाचं गुपीत सांग
जिथं.....
दहा बाय दहाच्या खोलीत
मोठा समूह रहातो
जिथं
या कुशीवर वळलं की बेड होतो
त्या कुशीवर वळलं की हाॅल...
पोटात आग पडली की तोच किचन!
कुठल्याच सुखसोई नसल्या तरीही
मजेत फुलतो हरेक देह...
ना कुणा रक्तदाब, ना कुणा मधुमेह...
काही सूचत नसेल तर तसं सांग
न बोलताच का चाललास लांब?
दोस्ता,
कदाचित इलाजाला पैसा नसेल याचसाठी
'विरंगुळ्याचे रोग' लागत नसतील त्यांच्यापाठी
त्यांचं दुःखच देतं त्यांना जगण्याचं बळ
त्याचं दुःखच घालतं त्यांना जगण्याची गळ
नीट उत्तर दे
प्रश्न आणखी विचारतो सोपा
कुठल्या शास्त्राला विचारून सुगरण विणते खोपा...?
दोस्ता... सुख नांदण्यासाठी
या खोलीचं तोंड त्या दिशेला नसावं
त्या खोलीचं तोंड या दिशेला नसावं
या तकलादू शास्त्रापेक्षा....
माणसाचं तोंड माणसाकड असावं
माणसाचं मन माणसाला दिसावं...
याचच शास्त्र तू यापुढं सांगाव॔...
(कवी राजन लादे यांच्या ''झुकल्यात पापण्या ज्या.... या संग्रहातून..)
0 comments:
Post a Comment