म्हणी

आजोबा आता तुमचा जमाना गेला आता आमच्या नवीन
म्हणी ऐका...
आधुनिक युगाच्या अफलातून आधुनिक म्हणी
��१) राहायला नाही घर म्हणे लग्न कर !
��२) सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये !
��३) खिशात नाही डोनेशन, घ्यायला चालला ऍडमिशन !
��४) मुलं करतात चॅनेल सर्फ़, आईबाप करतात होमवर्क !
��५) चुकली मुलं सायबरकॅफ़ेत !
��६) चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध् ये !
��७ ) ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार !
��८) नाजुक मानेला मोबाईलचा आधार !
��९) मनोरंजन नको रिंगटोन आवर !
��१०) स्क्रिनपेक्षा एस एम एस मोठा !
��११) जागा लहान फ़र्निचर महान !
��१२) उचलला मोबाईल लावला कानाला !
��१३) रिकाम्या पेपरला जाहिरातिंचा आधार !
��१४) काटकसर करुन जमवलं, इंकम टॅक्समध्ये गमावलं !
��१५) साधुसंत येती घरा, दारंखिडक्या बंद करा !
��१६) ज्याची खावी पोळी, त्यालाच घालावी गोळी !
��१७) एकमेका पुरवू कॉपी, अवघे होऊ उत्तीर्ण !
��१८) लांबून देखणी, जवळ आल्यावर चकणी !
��१९) चोर्या करुन थकला आणि शेवटी आमदार झाला !
��२०) आपले पक्षांतर, दुसर्याचा फुटीरपणा !
��२१) प्रयत्ने लाईनीत उभे राहता रॉकेलही मिळे !
��२२) अन्यायाचा फास बरा, पण चौकशीचा त्रास आवरा !
��२३) जया अंगी खोटेपण, तया मिळे मोठेपण !
��२४) एल.एल.बी झालो अन भिकेला लागलो !
��२५) सरकार जेवू घालीना, पदवी भिक मागू देईना !
��२६) वशिल्याच्या नोकरीला इंटरव्ह्यु कशाला !
��२७) वयही गेले, पैसेही गेले, हाती राहीले दाखले !
��२८) घोड्याच्या शर्यतीत वशिल्याचे गाढव पुढे !
��२९) साहेबापुढे वाचली गीता, कालचा मेमो बरा होता !
��३०) गाढवापुढे वाचली गीता वाचणारा गाढव होता !
��३१) स्मगलींगचे खाणार, त्याला दाऊद देणार !
��३२) मी हसते लोका, शेंबूड माझ्या नाका !
��३३) न्हाव्यावर रुसला अन जंगल वाढवून बसला !
��३४) पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा !
��३५) पुढार्याचं मुळ व हॉटेलची चूल पाहु नये !
��३६) नाव सुलोचनाबाई, चष्म्याशिवाय दिसत नाही !
��३७) नाव गंगूबाई, आंघोळीला पाणी नाही !
��३८) घरात नाही दाणा आणी म्हणे बर्शन आणा !
��३९) घरावर नाही कौल पण अॅंटीनाचा डौल !
��४०) घाईत घाई त्यात चष्मा नाही !
��४१) रिकामा माळी ढेकळ फोडी !
��४२) घरोघरी मॉडर्न पोरी !
��४३) ओठापेक्षा लिपस्टीक जड !
��४४) नाकापेक्षा चष्मा जड !
��४५) अपुर्या कपडयाला फॅशनचा आधार !
��४६) बायकोची धाव माहेरापर्यंत !
��४७) गोष्ट एक चित्रपट अनेक !
��४८) काम कमी फाईली फार!
��४९) लाच घे पण जाच आवर !
��५०) मंत्र्याच पोर गावाला घोर !
��५१) मरावे परी मूर्तिरुपे उरावे !
��५२) नटीच्या लग्नाला सतरा नवरे !
��५३) मिळवत्या मुलीला मागणी फार !
��५४) रिकामी मुलगी शृंगार करी!
��५५) प्रेमात पडला हुंडयास मुकला !
��५६) दुरुन पाहुणे साजरे !
��५७) ऑफीसात प्यून शहाणा !
��५८) सत्ता नको पण खैरनार आवर !
��५९) एक ना धड भाराभर पक्ष !
��६०) हरावे परी डिपॉझिटरुपी उरावे !
��६१) थेंबे थेंबे लोकसंख्या वाढे !
��६२) तोंडाला पदर गावाला गजर !
��६३) कष्टानं कमावलं बाटलीनं गमावलं !
��६४) रात्र थोडी डास फार !
��६५) शिर सलामत तो रोज हजामत !
��६६) नेता छोठा कटआऊट मोठा !
��६७) चिल्लरपुरता सत्यनारायण!
��६८) दैव देते आयकर नेत !
��६९) डीग्री लहान वशिला महान!

Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

Blog Archive

Powered by Blogger.

Recent

Comment

NEXT PAGE

FOR NEXT PAGE CLICK ON OLDER POSTS.

Search This Blog