MSG

नक्की वाचा कालजाचे पाणी पाणी होईल
.
पावसाळ्याचे दिवस सुरु होते.. पावसाने
राज्यात थैमान घातले होते.. जणू
ढगांना झालेल्या कसल्यातरी दु:खामुळे
ढग
जोर-जोरात रडत होते...
पावसाच्या सरीवर
सरी कोसळत होत्या.. घरातून बाहेर
निघायची सोय नव्हती...
आणि अशा परिस्थितीत अजय
आणि मेघा त्यांच्या चारचाकी कार ने
घरी निघाले होते..... पावसामुळे समोरचे
काही दिसत नव्हते, म्हणून अजय कार हळू
चालवत होता.
दोघांना घरी पोहचायला उशीर
होणार होता.... आणि पाऊस
त्यांच्या वाटेत
अजून बाधा घालत होता.
दोघे ही वैतागलेले
होते. पण निसर्गापुढे आजपर्यंत कोणाचे
काही चालले आहे का???
हळू हळू रात्र झाली होती.
ढगालेल्या वातावरणा मुळे काळोख
अगदी गडद
झाला होता. आता सरळ रस्ता संपून
घाट उतार
सुरु झाला होता. आणि अजय देखील
कार
सावधानतेने चालवत होता. मधेच
काळ्या अंधाराला चिरत एखादी वीज
जणू
पावसाच्या प्रचंडते ची जाणीव अजय
आणि मेघाला करू देत होती.....
पावसाळ्याचे
दिवस चालू असल्याने गाड्यांचा वावर
देखील
कमी झाला होता. घाट उतारावरील
एका वळणावर अजय ने
गाडीला जोरदार ब्रेक
लावला..... जोरदार आवाज झाला....
कार
थोडी घसरली... त्या धक्क्याने
कारच्या हेड
लाईट बंद पडल्या... कार देखील
घाटाच्या मध्यावर बंदं पडली....
मेघाला क्षणभर सुचलेच नाही काय झाले
ते.
ती कावरी-बावरी होऊन अजय वर
ओरडली....
पण अजय ला काळोखात जे दिसलं ते
मेघाच्या डोळ्यांनी पाहिलं नव्हतं....
आणि चमकणाऱ्या विजांच्या पांढऱ्या
प्रकाशात त्याला एक बाई
त्याच्या कार
च्या पुढे उभी असलेली दिसली.
अंगावरील
कपडे फाटली होती, डोक्यातून रक्त येत
होते,
हात-पाय रक्ताने माखले होते, जणू
त्या बाईचा आताच अपघात
झाला होता.....
ती बाई कार पासून थोड्या अंतरावर
उभी होती.
आता तर मेघाचे देखील तिच्याकडे लक्ष
गेलं
आणि भीती पोटी मेघाच्या तोंडून
मोठी किंकाळी निघाली.... ती प्रचंड
घाबरली होती. अजय तिला समजावत
होता,
पण तिचे घाबरणे कमी होत नव्हते,
तिला धाप
लागली होती.....
ती बाई धावतच अजय च्या कार जवळ
आली,
मेघाने झट-पट खिडक्यांच्या काचा वर
घेतल्या. इतक्यात त्या बाईचे रक्ताने
माखलेले
हात कारच्या काचेवर रेंगाळू लागले.....
अजय
देखील मनातून घाबरला होता, त्याने
कार चालू
करण्याचा खूप प्रयत्न केला पण कार चालू
झाली नाही. त्या बाईचे रक्ताने
माखलेले हात
काचेवरती फिरताना पाहून
मेघा घाबरलेली होती. .. तिला सावरणे
अजयसाठी कठीण झाले होते.... इतक्यात
अजय चे लक्ष त्या बाईच्या हातांकडे
गेले...
त्या बाईचे दोन्ही हात अजय
आणि मेघा समोर
जोडले गेले होते जणू ती बाई मदत मागत
होती.... अजय ने
माणशी काहीतरी विचार
केला आणि कार मधून घाबरतच बाहेर
पडला...
मेघा देखील त्याच्या पाठोपाठ कार
मध्ये
उतरली... इतक्यात त्या बाईने अजय पाय
पकडले आणि रडू लागली.... रडत रडत बोलू
लागली....," माझा अपघात झाला आहे
आणि माझी गाडी दरीत अडकली आहे
माझा ४
वर्षांचा मुलगा त्या गाडीत
अडकला आहे...
please तुम्ही त्याला वाचवा ना...."
आणि पुन्हा रडू लागली....
मेघा ला मात्र
हा भलताच प्रकार वाटू लागल्याने
मेघा खूप
घाबरली , आणि अजय ला तिथून निघून
जाऊ
असे म्हणू लागली..... पण अजय ने
त्या बाईला मदत करण्याचं पक्क केलं
होतं...
तो त्या बाई ला म्हणाला, 'चला ताई,
दाखवा मला कुठे आहे तुमची कार,
मी करतो तुम्हाला मदत', आणि ती बाई
पुढे
चालू लागली तसे तिच्या पाठी अजय
आणि मेघा देखील चालू लागले.... ते
दोघेही दरीच्या एका उंच कड्यावर
पोहचले
होते... अजय ला तिथून
रडणाऱ्या बाळाचा आवाज स्पष्ट येत
होता...
वरून पावसाची तिरीप डोळे
उघडायची संधी देत
नव्हती... अशा मुसळधार पावसात अजय
त्या छोट्या जीवाचे प्राण
वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण
धोक्यात घालून
एक-एक पाऊल दरीत उतरत होता.....
दरी खोल अशी नव्हती पण
तरी जीवघेणी मात्र
नक्कीच होती.... अजय जस-
जसा त्या कार
च्या जवळ पोहचत होता... तस-
तसा त्या मुलाचा रडण्याचा आवाज
तीव्र होत
होता....अजय आता त्या कार
च्या खिडकीजवळ आला होता...
त्याला ते मुल
तिथे रडताना दिसत होते... त्याने जवळून
अंधारात चाचपडत एक दगड
उचलला अणी खिडकी ची काच फोडून
त्या मुलाला बाहेर काढले.... ते मुल
देखील
अजय च्या हातात येताच रडायचे शांत
झाले.... अजय ने त्याला दरीतून बाहेर
काढताना त्याला कारच्या चालकाच्
वर
कोण तरी असल्याचे जाणवले म्हणून त्याने
त्या मुलाला दरीतून बाहेर काढून
मेघा जवळ
सोपवून तो पुन्हा त्या दरीत
अडकलेल्या गाडीत नक्की काय आहे ते
पाहण्यासाठी दरीत पुन्हा उतरू
लागला....
कार जवळ गेल्यावर त्याने
त्या अपघातग्रस्त
कार मध्ये चालकाच्या सीट वर नीट
डोकावून
पाहिले...... त्याने जे पाहिले
त्याच्या हृदयाला धक्का देणारे होते....
त्या सीट वर एका बाईचा मृतदेह
पडला होता... अजय नीट पाहिले
तेव्हा तो अजूनच अवाक् झाला....
तो मृतदेह
त्याच बाईचा होता....
जि त्याच्याकडे
तिच्या मुलाचे प्राण
वाचवण्यासाठी मदत
मागायला आली होती....
त्याने कसलाही विचार
आणि बोभाटा न
करता दरीतून काढता पाय घेतला....
तो दरीतून
वर आल्यावर मेघाने आजूबाजूला पाहिले
आणि अजयला विचारले कि, "कोण
होती ती बाई??? ती तुझ्याच मागे
आली होती, अचानक कुठे गेली...????" ,
यावर अजय ने एकाच उत्तर
दिले..... ,
"ती एक आई होती".....

Plz share it

Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

Blog Archive

Powered by Blogger.

Recent

Comment

NEXT PAGE

FOR NEXT PAGE CLICK ON OLDER POSTS.

Search This Blog