MSG
1⃣2⃣अंकाची बहाद्दुरी1⃣2⃣
१२ हा जुन्या लोकांचा फार प्रिय अंक.
मोजण्यासाठी जशी दशमान पध्दती लोकप्रिय तशीच द्वादशमान पध्दतीही.
आपण एक फूट म्हणजे १२ इंचाची पट्टी वापरतो.
एक डझन म्हणजे १२ नग.
वर्ष १२ महिन्यांचे.
आकाशातले नवग्रह १२ राशीतून फिरतात.
बारावा गुरू, शनि, मंगळ हानिकारक समजले जातात.
पूर्वी तपश्चर्या १२ वर्षे करीत गुरूगृही अध्ययनही १२ वर्ष चाले.
घड्याळात आकडे बारा.
पूर्ण दिवस जरी २४ तासांचा असला तरी आपण त्याचे १२/१२ तासांचे विभाजन केले आहे मध्यानपूर्व व मध्यान्हनंतर असे.
पूर्वी रात्रीचे १२ वाजले म्हणजे मध्यरात्र झाली असे समजत.
एखादी गोष्ट संपली तिचा निकाल लागला म्हणजे बारा वाजले असे म्हणतात.
जिकडेतिकडे सकाळी भरलेला बाजार साधारण बारा वाजता उठतो त्यावेळी राहिला उरला सुरला माल स्वस्त दरात विकण्यात येतो म्हणून एखादी वस्तू कूच किमतीला काढून टाकायची असेल तर ती १२ च्या भावात काढून टाका असा शब्दप्रयोग आहे.
पूर्वी १२ व्या वर्षी मुलींचे लग्न करत नसत.
आपल्याकडे १२ पैशांचा एक आणा होत असे इंग्लंडमधे १२ पेन्सचा १ शिलींग.
नवीन जन्मलेल्या अपत्याचे नामकरण १२ व्या दिवशी करतात त्याला बारसे म्हणण्याची पध्दत आहे
तसेच
मृत व्यक्तीचे धार्मिक विधीही १२ दिवसांनी करतात.
१२बलुतेदार, बारभाई, बारावाटा, बाराबंगले इ. शब्दप्रयोग अर्थपूर्ण आहेत.
एखाद्या अनुभवी बेरकी माणसाला १२ गावचं पाणी प्यायलेला आहे असं म्हणतात.
तसेच न ऐकणार्या रगेल दांडगट स्वभावाच्या व्यक्तीलाही 'काय बाराचा आहे हा!' असा शब्दप्रयोग वापरतात.
१२ ज्योतिर्लिंगे प्रसिध्द आहेत.
मराठी भाषेच्या वर्णमालेत स्वर १२ आहेत त्यावरूनच बाराखडी म्हणण्यात येते.
१२ गावचा मुखिया.
जमिनीला ७/१२ चा उतारा लागतोच.
अशी ही १२ ची किमया.....
0 comments:
Post a Comment