NILA WADAL


एकदा एका राजाचा हत्ती अचानक लंगडायला लागला. बरेच वैद्य, उपचार झाले पण हत्तीच्या चालण्यात काही फरक पडेना. राजा खूपच चिंताग्रस्त झाला. याच दरम्यान त्या नगरीत भगवान बुद्धांच्या भिक्खूसंघाचे आगमन झाले होते. त्यामुळे कोणीतरी राजाला हत्तीच्या लंगडण्याविषयी भगवान बुद्धांना भेटण्याचा सल्ला दिला. राजाने तथागतांची भेट घेतली.

भगवान बुद्धांनी परिस्थिती पाहिली आणि हत्तीचा माहुत बदलण्यास सांगितले. तथागतांचा उपदेश मानून राजाने माहुत बदलला आणि काय आश्चर्य? हत्ती व्यवस्थित चालू लागला. राजाला आश्चर्य वाटले. राजाने तथागतांना विचारले, तथागत अनेक वैद्यांच्या औषधोपचाराचा हत्तीवर परिणाम झाला नाही. मात्र आपल्या केवळ उपदेशाने हत्ती व्यवस्थीत चालू लागला याचे रहस्य काय? तेव्हा तथागत म्हणाले, "रहस्य काहीच नाही, या हत्तीचा जो माहुत तो लंगडत चालत होता. आणि हत्ती त्याचे अनुकरण करत होता. त्यामुळे हत्तीचा माहुत बदलणे गरजेचे होते.

आपली अवस्था अशीच आहे. आपण सद्‌सद्‌ विवेक बुद्धीने विचार न करता अशा अनेक बाबींचे अंधानुकरण करीत आहोत, त्यामुळेच आपली वाटचाल लंगड्या हत्ती प्रमाणे सुरू आहे. आपली वाटचाल सुव्यवस्थीत होण्यासाठी आपला माहुत सदाचारी असला पाहिजे
---'तरुणांसाठी :--

1) अन्य जाती-धर्मांवर टिका
     करत वेळ वाया घालवू नका.
     जे चांगलं असेल त्या गोष्टी
     आत्मसात करा.

2) दंगली- मारामारी करुण आपलं
     नाव खराब करुण घेऊ नका.
     आता लढाईचा काळ
     राहिलेला नाही.

3) उच्च शिक्षण तुम्हाला आणि
    तुमच्या पुढच्या पिढीला चांगलं
    जीवन देऊ शकतं.

4) राजकीय पक्षांचे झेंडे उचलून
    गुलामी करू नका.

5) आजचा तरुण एकमेकांना मदत
    करुण प्रगती करू शकतो.
    त्यासाठी राजकीय पक्षाची  वा
     नेत्याची गरज नाही.

6) मंदिरात दान करण्याऐवजी
    गरीब आणि गरजू तरुणांना
    मदत करा. ते तुम्हालाही कधीतरी
    मदत करतीलच.

7) चार दिवस सुट्टी काढून
     फिरण्याऐवजी तेव्हडाच् वेळ
    समाजाच्या प्रगतीसाठी द्या
    समाजही तुम्हाला कधीतरी
    मदत नक्कीच करेल

������������

गौतम बुध्दानी दिलेले सुंदर उत्तर

एका शिश्याने भगवान बुध्दाना विचारले, आवड आणि प्रेम यात काय फरक आहे?

गौतम बुध्दांनी अगदी सोपे उत्तर दिले

"जेव्हा एखादे फुल तुम्हाला आवडते ते तुम्ही तोड़ता. पण जेव्हा तुम्ही फुलावर प्रेम करता तेव्हा तुम्ही त्याला रोज पाणी घालता".!

ज्याला हे कळले त्याला जीवन कळले !

जरी मला 'जन्म' माझ्या "आई
वडिलांनी"
दिला असला तरी...
.
.
.
'माणुस' बनून
जगण्याचा अधिकार फक्त
"डाँ बाबासाहेब आंबेडकरांनी"
दिला आहे...


डाॅ. बाबासाहेबांचा शेवटचा संदेश...
मंगळवार दि.31जुलै1956.
     माझी पहिली खंत ही आहे की, मी माझे जीवन कार्य पुर्ण करू शकलेलो नाही.माझे लोक इतर समाजाशी बरोबरीपुर्वक राजकीय सत्तेचे वाटेकरी होऊन सत्ताधारक वर्ग बनलेले पाहण्याची माझी इच्छा होती.जे काही मी मिळवू शकलो त्याचा फायदा ' मुठभर सुशिक्षितांनी ' घेतला आहे,पण ' त्यांचे विश्वासघातकी वागणे ' आणि दलित शोषितांबद्दची त्यांची अनास्था पाहिल्यावर ते फारच नालायक निघाले असेच म्हणावे लागेल.ते माझ्या कल्पना शक्तीच्या पलीकडे गेले आहे.ते फक्त स्वत:साठी आणि त्याच्यां व्यक्तीगत फायद्यासाठीच जगतात.त्याच्यांपैकी एकही जन सामाजिक कार्य करायला तयार नसतो.ते आत्मघाताच्या वाटेने निघाले आहेत.माझ्या ज्या सहकार्याबद्दल ती चळवळ चालवतील असा माझा विश्वास आणि भरवसा होता ते आज नेतृत्वासाठी आणि सत्तेसाठी एकमेकांत भांडत आहेत.त्यांच्या शिरावर येऊ घातलेली जबाबदारी ही किती मोठी आहे त्यांच्या ध्यानी मनीही असल्याचे दिसत नाही.
        मी त्यांच्यासाठी जे काही मिळवून देऊ शकलो ते मी एकठयाच्या बळावर मिळवले आहे.ते करताना पिळवटून टाकणार्या संकटांचा आणि अनंत अडचणींचा मुकाबला मला करावा लागला.सगळीकडून विशेषत: हिंदू वृत्तपत्रसृष्टीकडून माझ्यावर शिव्याशापांचा वर्षाव सतत होत राहिला.जन्मभर मी माझ्या विरोधकांशी संघर्ष केला,माझ्या स्वत:च्या काही लोकांनी मला स्वार्थासाठी गंडवले,त्यांच्याशीही मी दोन हात केले.मी माझ्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत देशाची आणि पददलितांची सेवा करीतच राहीन.हा काफला(चळवळ)आज जेथे दिसतो तेथे त्याला आणता-आणता मला खूप सायास पडले.हा काफला असाच त्यांनी पूढे आणखी पूढे चालू ठेवावा.वाटेत अनेक अडथळे येतील,अडचणी येतील,अकल्पित संकटे कोसळतील, पण वाटचाल सुरूच ठेवावी.त्यांना जर सन्मानाने प्रतिष्ठापूर्वक जीवन जगायची इच्छा असेल तर हे आव्हान त्यांनी पेलायलाच पाहिजे.जर माझे लोक माझे सहकारी हा काफला पूढे नण्यास असमर्थ ठरलेच तर किमान तो आज जेथे आहे तेथे तरी त्यांनी त्यास राहू द्यावे.कोणत्याही परिस्थितीत त्यांनी या काफल्यास परत फिरू देऊ नये.हा माझा संदेश आहे.बहूधा शेवटचा संदेश आहे.मी तो अत्यंत गंभीरपणे देत आहे आणि या गांभीर्याला नजरे आड केले जाणार नाही अशी खात्री मला वाटते.

संदर्भ:डाॅ बाबासाहेब आंबेडकर अनुभव आणि आठवणी-
नानक चंद रत्तू.
पृष्ठ 227-230.
(कृपाया, सर्व बौध्दांना आणि इतर आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्यांना पाठवावा.)

Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

Blog Archive

Powered by Blogger.

Recent

Comment

NEXT PAGE

FOR NEXT PAGE CLICK ON OLDER POSTS.

Search This Blog