MSG
"खाकी"
खाकी कपड्यावाल्या तुजं,
कर्ज कसं फ़ेडायचं....
ढोरावानी राबतुस येड्या,...
इसरुन गेला रडायचं......॥धृ॥
आमी शिमगा दिवाळी खातो,
तवा तु बंदुबस्ताला जातो....
उताणे आमी झोपती तवा,
वणवण बाहेर एकला फ़िरतो....
आमची गाडगी भरलीत सारी,
तुझं कधी भरायचं.....
आमचं काम उरकलं जरी,
तुझं कधी सरायचं........॥धृ॥
कुत्र्यावानी मरत्यात लोकं,
पहिला पाहूणा व्हऊन यतो....
घरची लोकं नाकं दाबत्यात,
तरी मढ्याच्या जवळ जातो......
चोर्या व्हत्यात गावुगावी,
तिडंबी तुला पळायच....
तुज्या काळजाचं दुखणं बाबा,
न्हाई कुणाला कळायचं......॥धृ॥
एका दणक्यात लबाडी बाहेर,
जादुटोणा करतुस कशी.....
कितीबी मोठा दरुडा पडला,
चोरं तु धरतुस कशी.....
तुजं जगणं संतांवाणी,
या लोकानसाठी खपायचं.......
आमच्या लफ़ड्यांपायी बाबा,
इसरुन गेला झोपायचं......॥धृ॥
खाकी कपड्यावाल्या तुजं,
कर्ज कसं फ़ेडायचं....
ढोरावानी राबतुस येड्या,
इसरुन गेला रडायचं.....
Thanks to police plz share
0 comments:
Post a Comment