MSG

हे साले मित्र सगळे असेच असतात,
चिडवून
सतावून
जीव
नकोसा करतात,
तरीही नेहमी हवेसेच
वाटतात....

लग्नापूर्वी प्रेयसीला पाहून '
आयटम सही है'
म्हणून
चिडवतात , लग्ना नंतर तीलाच
आदराने
' वहिनी ' अशी हाक मारतात .े
हे साले मित्र सगळे असेच असतात....

जेवताना एकमेकांच्या डब्यावर
सगळ्यांचीच
नजर असते,
खास पदार्थ
सर्वाना पुरेल ,याची मात्र
खात्री नसते.
पण...
एखाद्या दिवशी डबा नाही आणला,
तरी आपलेच ताट
इतरांपेक्षा जास्त भरते.
हे साले मित्र सगळे असेच असतात...

नाक्यावारती गप्पा मारताना..
तीन में पाँच -
बिस्किट & चहाची अशी ओर्डर सुटते,
बिल भरण्याची वेळ
आली कि सर्वांचीच
पांगा पांग
होते ,
मात्र
अचानक
कधी बाबाना admit करावे
लागते,
"आहोत आम्ही पाठीशी" म्हणत
advance
नकळत भरले
जाते.
हे साले मित्र सगळे असेच असतात...

अवचित
एखादाप्रसंग ओढावला तर, सख्खे
नातेवाईक
ही
पाठ
फिरवतात,
अशावेळी छळनारे हेच
मित्र
पाठीशी भक्कमपणे उभे राहतात,
रक्ताच्या नात्या पेक्षा ही मैत्रीचे
नाते श्रेष्ठ ठरवितात.
हे साले मित्र सगळे असेच असतात |
चिडवून
सतावून जीव
नकोसा करतात |
तरीही नेहमी हवेसेच
वाटतात.....
जी गोष्ट आई वडिलांना माहित नसते ती मित्राला माहित
असते..

जी गोष्ट शिक्षकांना माहित नसते ती मित्राला माहित असते..

जी गोष्ट गर्ल फ्रेंड माहित नसते ती मित्राला माहित असते..

जी गोष्ट बायकोला माहित नसते ती मित्राला माहित असते..

आई वडिलांचा एवढंच काय पण बायकोचं सुद्धा उष्ट
खाताना कधी कधी मन संकोच करत
पण मित्राचं उष्ट मात्र बिनधास्त चालते...

मित्रांवर जळलो असेल मनातून खरं आहे ,,
पण ...

माझ्या पिंडीला कावळा कसा शिवेल हे फक्त
मित्रालाच माहित असते..


शेवटी कोण रडलं नाही तरी मित्र मात्र जिथे असेल तिथे
डोळ्यात पाणी काढेल हे नक्की...
I LOVE YOU FRIENDS��

Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

Blog Archive

Powered by Blogger.

Recent

Comment

NEXT PAGE

FOR NEXT PAGE CLICK ON OLDER POSTS.

Search This Blog