MSG
"एक छोटीशी कथा"
एक कुत्री असते तिचे लहान लहान पिल्ले असतात, ते रोज आपल्या आईला विनंती करतात की, आई मला बाहेर जाउदे ना, बाहेरची दुनिया पाहू दे ना....!
त्यावर पिलांची आई म्हणते नका जाऊ बाहेर बाहेरची दुनिया खुप खराब आहे ।
मग लहान पिल्ले 2-3 दिवस शांत बसतात.!
नंतर पिल्ले पुन्हा आईला विचारतात बाहेर जाऊ देना आई आम्हाला बाहेरची दुनिया पाहू देना आई ।त्यावर पुन्हा पिलांची आई म्हणते नाका जाऊ बाहेरची दुनिया फार वाईट आहे ।
एके दिवशी ते लहान पिल्ले आईला न विचारता बाहेर निघून जातात त्यांना तुमच्यासारखे भेटतात ते छोट्या पिलान्ना लगेच बिस्किट घेउन खाऊ खालतात ते पिल्लै आनंदी होउन पुढे जातात नंतर पुन्हा एक काका भेटतात ते त्यांना भाकरी चा तुकडा खाऊ घालतात ।
ते पिल्ले खुप खुश होउन घराकडे निघतात.....!
परंतु त्यांना समोर एक मोठा कुत्रा दिसतो तो मोठा कुत्रा लहान पिलान्ना खुप मारतात, रक्त भांबाळ करतात ते पिल्ले रडत रडत घरी जातात ।
पिलांची आई घरी असते ती पिलान्ना म्हणते मी तुम्हाला सांगीतल होत ना की बाहेरची दुनिया खराब आहे तर पिल्ले म्हंटले नाही आई बाहेरची दुनिया खुप छान आहे पण
"आपलेच लोक खराब आहेत"
GOOD THOUGHT
करोडो में नीलाम हो रहे हैं
एक नेता के उतारे हुए सूट ।
कचरे में फेक देते है
शहीदों की वर्दी और बूट ।।
JOKS
प्रेमी: प्रिये, आपल्या लग्नाला तुझ्या घरच्या सर्वांनी कशी काय परवानगी दिली?
प्रेमिका: काही नाही, एका प्रश्नाचे उत्तर दिले आणी सर्व तयार झाले.
प्रेमी: काय प्रश्न विचारला होता???
प्रेमीका: मुलगा काय करतो !
मी सांगीतले, पोटात आतुन लाथ मारतो..
MSG
आयुष्यात जवळच्या व्यक्तिने केलेला विश्वासघात आणि
योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक,
माणसाला त्याच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडतात..!
वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही.... तो थांबतो, वेळ जाऊ देतो, अन
पुन्हा एकदा बाहेर पडतो..... घेऊन, तीच दहशत.....अन
तोच दरारा!!!
पराभवाने माणुस संपत नाही.,
प्रयत्न सोडतो तेंव्हा तो संपतो..
कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
की "शर्यत अजुन संपली नाही, कारण मी अजुन
जिंकलेलो नाही..."
JOKS
Confusing joke..
हुशार माणसांसाठी
आई: बंटी दुकानातून १ दुधाची पिशवी आण आणि अंडी असतील तर ६ आण.
बंटी: आई ६ दुधाच्या पिशव्या आणल्यात.
आई: मेल्या १च पिशवी सांगितली होती.
बंटी: आई दुकानात अंडी होती म्हणून ६ आणल्या.
समजलं नसेलंच..
परत वाचा..
MSG
****** निवड... ******
शाळेने पत्रक काढलं; यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक मदत द्यायची आहे, तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा,ज्यायोगे ही मदत योग्य विद्यार्थ्याला/विद्यार्थिनीला मिळेल !
आता सर्वात गरीब मुलगा शोधणे म्हणजे, खरोखर पंचाईतच होती. ही छोटी मुलंसुद्धा इतकी नीटनेटकी राहतात की,अगदी एक विजार, एक सदरा असेल,तरी तो रोज धुऊन-वाळवून त्याची इस्त्री केल्यासारखी घडी करून मगच तो घालतात
गरीब मुलगा शोधायचा कसा ? आणि प्रत्येकाला विचारायचं तरी कसं, तुमच्यात कोण गरीब; तेही सर्वात गरीब म्हणून? मोठीच अडचण होती. तीन - चार दिवस नुसता अंदाज बांधण्यात गेले. वयाने मोठ्या माणसांमधे गरीब माणूस शोधणं सोप्पं आहे ;पण लहान मुलांमधे अडचणीचं. शेवटी दोन-चार मुलांना हाताशी घेतलं, जी गाडीने शाळेत यायची
आणि गाडीनेच घरी जायची.
मधल्या सुट्टीत अचानक वर्गात आलो तर ती सफ़रचंद खातांना मला दिसायची. अशा मुलांना विचारलं ," मला एक मदत कराल का? आपल्या वर्गातला सर्वात गरीब.......?"
क्षणाचाही विलंब न करता सर्वानी एकच नाव उच्चारले," सर आपल्या वर्गातला तो मयूर आहे नं, तो सर्वात गरीब आहे."
मुलांनी एका झटक्यात प्रश्न सोडवला होता. "कशावरून म्हणता?"
" सर. त्याचा सदरा दोन- तीन ठिकाणी तरी फ़ाटलाय. त्याने शिवलाय; पण फ़ाटलेला शर्ट घालतो. त्याची खाकी पॅंट तर नीट बघा , मागून दोन ठिगळं लावलेली आहेत. चपला त्याला नाहीतच. मधल्या सुट्टीत आम्ही डबा उघडतो . तो मात्र प्लॅस्टीकच्या पिशवीतून अर्धी भाकरी आणतो. सर,ती भाकरीही कालचीच असते. भाजी कुठली सर? गुळाचा खडा असतो. आम्ही सांगतो,तो सर्वात गरीब आहे. शाळेने त्याच मुलाला मदत द्यायला हवी ."
मुलं एखाद्या खळाळत्या प्रवाहासारखी पुढे बोलतच राहीली . पण मला ते ऐकू येणे शक्य नव्हते. मयूर एवढा गरीब असेल? की सर्वांनी एकमुखाने त्याच्या गरीबीचे दाखले द्यावेत? कारण, मयूर वर्गातील सगळ्यात चपळ मुलगा होता. अक्षर स्वच्छ, मोकळं होतं. त्या अक्षरात त्याच्या नितळ मनाचे दर्शन मला घडे. एकदा तर त्याची वही मी माझ्या घरात पत्नीला दाखवली आणि म्हट्लं, " पाहिलंस ! हे सातवीतल्या मुलाचे अक्षर.असं अक्षर असावं हे माझे स्वप्न होते. उत्तराला सुबक परीच्छेद, समास सोडून योग्य प्रस्तावना आणि अखेर करून लिहिलेली उत्तरे........." चे गठ्ठे आणायला मयूर सर्वात आधी धावत यॆई. माझ्याआधी ते गठ्ठे उचलून वर्गात नेण्याचा उत्साह मला थक्क करून टाकत असे
.
असा मयूर परिस्थितीने एवढा खचलेला असेल याची कल्पनासुद्धा मला येऊ नये, या गोष्टीचीच मला खंत वाटली .जी गोष्ट माझ्या इतर विद्यार्थ्यांना उमगते आणि मला त्याचा पत्ताही नसतो......अरेरे!..., मी खूप कमी पडतोय. मयूर , गेल्या सहलीला आला नव्हता. अवघी पंचवीस रूपये वर्गणी होती ; पण त्याचं नाव यादीत नव्हतं. आपण त्याला साधं विचारलंसुद्धा नाही.
असलेल्या मुलांच्या किलबिलाटात न आलेल्या मयूरची मला आठवणही झाली नव्हती. केवळ पंचवीस रूपये नसल्याने त्याचे National Park बघण्याचे राहून गेले. एका छान अनुभवाला मुकला होता तो. हा आनंद मी हिरावला होता.यादीत मयूरचे नाव नाही म्हणून मी त्याला जवळ का बोलावलं नाही? मयूर स्वत:हून सांगणं शक्यच नव्हतं आणि माझ्या व्यग्र दिनक्रमात मयूरसाठी जणू वेळच शिल्लक नव्हता!
शिक्षक म्हणून मी एक पायरी खाली आलो होतो. खरंच आहे, मुलांनी सुचवलेलं नाव. आर्थिक मदत, तीही भरघोस मदत मयूरला मिळायलाच हवी.आता शंकाच नव्हती.त्याची गरीबी
बघायला त्याच्या घरी जायचेही काहीच कारण नव्हते. मुलांनी एकमुखाने सुचवलेले नाव आणि मयूरने सहलीला न येणं याची सांगड घालून मी मुख्याध्यापकांना नाव देउन
टाकले';मयूर जाधव, सातवी अ, अनुक्रमांक बेचाळीस';
डोळ्यावरचा चष्मा हातात खेळवीत आदरणीय मुख्याध्यापक म्हणाले, " खात्री केलीये ना सर? कारण थोडीथोडकी रक्कम नाही. या विद्यार्थ्याची वर्षाची फ़ी, त्याचे शालेय शिक्षण साहित्य, गणवेश...इत्यादी सर्व या रकमेत सामावणार आहे."
मुख्याध्यापकांना मोठया आत्मविश्वासाने मी म्हटलं, " सर, त्याची काळजीच करू नका. वर्गातला सर्वात गरीब आणि आदर्शही म्हणा हवं तर-मयूर जाधवच आहे!"
एका योग्य विद्यार्थ्याची निवड केल्याचे समाधान घेऊन मी निघालो.मयूरला मिळणारी मदत, त्यामुळे त्याचे आर्थिकद्रूष्ट्या सुसह्य होणारे शैक्षणिक वर्ष याची कल्पनाचित्रे रंगवतांना दिवस कसा संपला ते कळालेच नाही.
दुस~या दिवशी शाळेत लवकरच गेलो. देखण्या अक्षराच्या कदम सरांनी मोठ्या दिमाखाने फ़ळा सजवला होता.त्यावर 'गरीब असूनही आदर्श ' असं म्हणून मयूरचं नाव होतं. शाळा भरली. मी अध्यापक खोलीत बसलेलो होतो .इतक्यात खोलीच्या दाराशी मयूर उभा दिसला.
त्याच्या चेह~यावरचा भाव समजत नव्हता. राग आवरावा तसा करारी चेहरा... " सर, रागवू नका; पण आधी त्या फ़ळ्यावरचे माझे नाव पुसुन टाका." " अरे, काय बोलतोयस तुला समजतय का?" " चुकतही असेन मी . वाट्टेल ती शिक्षा करा; पण ते नाव...!!"
त्याच्या आवळलेल्या मुठी, घशातला आवंढा, डोळ्यातलं पाणी......मला कशाचाच काही अर्थ लागेना.मी ज्याचं अभिनंदन करायच्या तयारीत,तो असा.....?
" सर,मला मदत कशासाठी? गरीब म्हणून? मी तर श्रीमंत आहे."
त्याची रफ़ू केलेली कालर माझ्या नजरेतून सुटत नव्हती. येतानाच त्याचे अनवाणी पाय पाहिले होते. शाळेच्या चौदा वर्षाच्या माझ्या व्यावसायिक कालखंडात अशी पंचाईत प्रथमच आली होती.
"अरे पण....?"
"सर,विश्वास ठेवा.मी श्रीमंत आहे.कदाचित सर्वात श्रीमंत असेन... सर,मी गरीब आहे हे ठरवले कोणी? मी चुकतोय बोलतांना हे कळतंय मला; पण सर ते नाव तसंच राहिले तर मी आजारी पडेन आज."
अचानक तो जवळ आला आणि त्याने माझे पायच धरले. त्याला उठवत मी म्हणालो, " ठीक आहे. तुला नकोय ना ती मदत, नको घेऊस; पण तू श्रीमंत आहेस ते कसे काय?"
" सर, माझ्या अभ्यासाच्या वह्या बघा, कुठल्याही विषयाच्या.... त्या पूर्ण आहेत.पुस्तकं मी Second Hand वापरतोय ...खरयं ! पण मजकूर तर तोच असतो ना? मनात काय उतरवतो ते महत्वाचे नाही का? सर,माझे पाचवीपासूनचे मार्क बघा, नेहमी पहिल्या तीनात असतो. गेल्या वर्षी स्पोर्टसपासून निबंधापर्यंत सर्व बक्षिसे मलाच आहेत. सर... सर,सांगा ना,मी गरीब कसा?"
मयूर मलाच विचारत होताआता मघाचचं दु:खाचं पाणी विरून त्यात भविष्याचं स्वप्न थरारत होतं.
" खरयं मयूर. पण तुला या पैशाने मदतच......."
" सर , मदत कसली? माझी श्रम करण्याची वॄत्तीच नाहीशी होइल. शाळाच फ़ी देतीये म्हटल्यावर, मी वडीलांबरोबर रंगाच्या कामाला जाणं बंद करेन! "
"म्हणजे?"
" वडील घरांना रंग द्यायचे काम करतात. Contractor बोलावतो तेव्हाच काम मिळते. तेव्हा ते मला त्यांच्याबरोबर नेतात. चार पैसे मला मिळतात, ते मी साठवतो. सर, संचयिका आहे ना शाळेची,त्यातलं माझं पासबुक बघा.पुढच्याही वर्षाची फ़ी देता येइल एवढी रक्कम आहे त्यात...
मुलांनी तुम्हाला काहीतरीच सांगितलेले दिसते.....म्हणून तुम्ही मला निवडलेलं दिसतं. पण सर,मीच नाही तर आमचं घरच श्रीमंत आहे. घरातले सगले काम करतात. काम म्हणजे कष्ट. रंगाचं काम नसतं तेव्हा बाबा स्टेशनवर हमालीही करतात.आई धुणं-भांडी करते. मोठी बहीण दुसरी-तिसरीच्या शिकवण्या घेते.सर,वेळ कसा जातो,दिवस कसा संपतो ते कळतच नाही....शाळेतल्या वाचनलयातली पुस्तकं मीच सर्वात जास्त वाचली आहेत. तुम्हीच सांगितल्याप्रमाणे लेखकांनाही पत्र पाठवतो मी. सर,माझ्या घरी याच तुम्ही, माझ्याकडे पु.ल. देशपांडे यांच्या स्वाक्षरीचं पत्र आहे. ........सर, आहे ना मी श्रीमंत?"
आता तर तो स्मितरेषांनी मोहरला होता.सर, शेजारच्या काकांकडून मी उरलेल्या वेळात पेटीही शिकलो. रात्री देवळात होण्या~या भजनात मीच पेटीची साथ देतो.भजनीबुवा किती छान गातात! ऐकताना भान हरपून जातं."
त्याच्या सावळ्या रंगातही निरोगीपणा चमकत होता. अभावितपणे मी विचारलं," व्यायामशाळेतही जातोस?"
"सर,तेवढी फ़ुरसत कुठली? घरातच रोज चोवीस सूर्यनमस्कार आणि पन्नास बैठका काढतो ."
अंगावर एक थरार उमटला...कौतुकाचा.
" मयूर मित्रा ,मला तुझा अभिमान वाटतो.तुझ्यासारखा श्रीमंत मुलगा माझ्या वर्गात आहे त्याचा .."
" म्हणूनच म्हणतो सर......!"
" हे नाव ज्या कारणासाठी आहे, त्यात तू नक्कीच बसणार नाहीस. आमची निवड चुकली; पण याचं रूपांतर वेगळ्या शिष्यवॄत्तीत होईल. शाळेतील सर्वात अष्टपैलू बुद्धिमान मुलगा म्हणून, हे पारितोषीक तरी........."
" सर, एवढ्यात नाही. त्याला वर्ष जाउ द्या . मी लिंकनचं, सावरकरांचं चरित्र वाचलं ,हेलन केलरचं चरित्र वाचलं.सर, हे वाचलं की कळतं की ही माणसे केवढे कष्ट करून मोठी झाली. माझ्यासारख्या मुलांना प्रोत्साहन द्या, योग्य वयात ते परखड मार्गदर्शन करा; पण सर, नको त्या वयात असा पैसा पुरवत गेलात तर घडायचं राहूनच जाईल. जे काय करतोय ते पैशासाठी असे हॊऊन जाईल... सर.....प्लीज.....!"
वाचनानं, स्पर्धांतल्या सहभागानं , कलेच्या स्पर्शानं ,कष्टानं....... त्याच्या वाणीला प्रगल्भतेची खोली होती,संस्कारामुळे नम्रतेची झालर होती . आता मला माझ्या समोरचा मयूर जाधव स्पष्ट दिसतही नव्हता. त्याच्याबद्दलच्या कौतुकाचे अश्रू माझ्या डोळ्यात दाटले होते.
शाळेतला सर्वात श्रीमंत मुलगा माझ्यासमोर उभा होता. परिस्थिती पचवून, परीश्रमाने स्वत:वर पैलू पाडणारा ! श्रीमंत!
========================
एक अप्रतिम सुन्दर लेख....
प्रत्येकाने जरुर वाचावा असा.......
कृपा करून वेळ काढून वाचा.. आवडल्यास शेअर करावा
=======================
MSG
एकदा एक छोटा मुलगा
आईसक्रिम शाँप मध्ये गेला
आणि विचारल : हे
मोठ आईसक्रिम
कितीला आहे..?
वेटर : १५ रु. ला...
( मुलगा पाँकेट चेक करतो तर
त्याच्या कडे १५ रु. असतात )
मुलगा : आणी छोटा आईसक्रिम
कितीला आहे ?
वेटर : ( चिडुन ) १० रु. ला...
मुलगा : मग मला छोटच
आईसक्रिम द्या...
वेटर चिडुन त्याला आईसक्रिम
देतो...
मुलगा आईसक्रिम खाऊन उठून
जातो...
वेटर जेव्हा त्याची आईसक्रिम
ची प्लेट
उचलायला येतो तेव्हा त्याचे डोळे
पाणावतात..
त्या चिमुरड्याने ५ रु. टिप
ठेवलेली असते....
आयुष्य हे
नेहमी दुसर्यासाठी असलं
पाहिजे आणि जे तुमच्याकडे आहे ते
ईतरांना देऊन त्यांना आंनदी ठेवा☺
MSG
खर प्रेम काय असत?????
एक धनगर मेढया चरायला सोडुन ढोल वाजवत बसला होता.
त्याने
पाहीलं की ढोलच्या आवाजाने एक
हरीणी त्याच्या शेजारी येऊन
बसली,
जसजशी त्या ढोलवर धनगराची थाप
पडायची तसतसं त्या हरीणीच्या डोळ्यांतुन अश्रु यायचे,
एक दिवस गेला,
दोन दिवस
गेले, तीन, चार, पाच दिवसांमागुन दिवस गेले.
पण परिस्थिती काही बदलत नव्हती,
धनगर जसजसं
ढोल वाजवायचा ती हरीणी तिथे येऊन जवळ बसुन रडु लागायची..
एक दोनवेळा त्या धनगराने त्या हरीणीला हाकलले
देखील पण जसजशी ती थाप ऐकु
यायची ती पुन्हा त्या आवाजाने तिकडे ओढली जायची...
मग एक दिवस धनगर ढोल
वाजवता वाजवता मध्येच थांबला,
ती हरीणी रडणं
थांबवुन निघुन जाऊ लागली.
त्याने
पुन्हा वाजवायला सुरुवात
केली.
हरीणी पुन्हा जवळ आली,
धनगराने हरीणी समोर हात जोडले आणि म्हणाला,
माझं काही चुकतं का गं?
मी कित्येक दिवस बघतोय
जेव्हा जेव्हा मी ढोल वाजवतो तेव्हा तेव्हा तु ईथे येऊन रडतेस.
कारण काय आहे.
सांगना माझं
काही चुकतं का गं?
तेव्हा ती हरीणी म्हणाली,
तुम्ही कोण आहात
मला माहीती नाही,
हे काय वाद्य आहे मला माहीती नाही,
पण जेव्हा तुम्ही हे वाद्य
वाजवता,
यावर पडणारी तुमच्या हाताची प्रत्येक थाप माझ्या काळजावर घाव घालते हो, कारण
याला जे कातडं लावलंय ना,
ते माझ्या आयुष्याचा साथीदार,माझ्या नवर्याचं आहे..
हे ऐकुन धनगर निशब्द झाला..
हरीणी पुढे म्हणाली,
माझी एक विनंती आहे तुम्हाला॥
माझ्या मृत्युनंतर
या वाद्याच्या एका बाजुला माझं कातडं लावा,
कारण या वाद्यातुन मनाला परमोच्च सुख
देणारे संगीत तेव्हाच बाहेर पडेल
जेव्हा दोन्ही बाजुंनी ढोल तितक्याच लयमध्ये
वाजवला जाईल.
म्हणजेच त्याच्या एवढंच दुःख
मलाही सहन करावं लागेल..
असं म्हणुन
त्या हरीणीने जागीच प्राण सोडले..
दुःखी मनाने त्या धनगराने त्या हरीणीचं कातडं
ढोलच्या एका बाजुला लावलं. आज तो ढोल
वाजवताना त्या हरीणीच्या डोळ्यातुन पाणी येत
नाही
पण तो ढोल
वाजवणार्या धनगराच्या डोळ्यांत मात्र अश्रु दाठुन येतात कारण जेव्हा तो ढोल दोन्ही बाजुने
वाजतो तेव्हा त्याला वाटतं ते जोडपं एकमेकांशी बोलुन आपली सुख दुःखं वाटुन घेत
आहेत.
ज्यांनी जन्मच नाही तर मरण देखील वाटुन घेतलं.......
Its call True Love
MSG
नामदेवा नंतर ' पाया ' नाही ।
तुकोबा नंतर " जगतगुरु " नाही ।
जिजाऊ नंतर '" संस्कार " नाही ।
शिवबा नंतर " छत्रपती " नाही ।
शंभुराजे नंतर " आचरण " नाही
वाल्ह्या नंतर " परिवर्तन " नाही ।
पुंडलिका नंतर " सेवा " नाही ।
जोतिबा नंतर " सत्यशोधक " नाही
सावित्री नंतर " शिक्षण " नाही ।
जिवाजी नंतर " रक्षण " नाही ।
मावळ्या नंतर " मरण " नाही ।
बाबासाहेबा नंतर " संविधान " नाही
केशवसुर्या नंतर " गायन " नाही ।
राजर्षिनंतर " आरक्षण " नाही ।
आण्णा नंतर " लोकशाहीर " नाही ।
गाडगे बाबा नंतर " लोकजागर " नाही ।
माणसा हा जन्म पुन्हा नाही.
MSG
नदी में पानी मीठा रहता हैं
क्योंकि वो देती रहती हैं
सागर का पानी खारा रहता हैं
क्योंकि वो लेता रहता हैं
नाले का पानी दुर्गन्ध पैदा करता है
क्योंकि वो रूका रहता है
अपना जीवन भी वैसा ही हैं।
देतें रहेंगे तो मीठे लगेंगे
लेतें रहेंगे तो खारे लगेंगे
रूके रहेंगे तो बेचारे लगेंगे।
ओमशान्ति
MSG
मास्तर:- विद्यार्थी जास्त वेळ झोप का काढतात...???
.
.
एका खट्याळ विद्यार्थ्याने दिलेले नाद खुळा उत्तर.....
..
.
.
.
.
.
.
विद्यार्थी:- कारण आमची स्वप्नं फार मोठी असतात.
पेन : दुसऱ्याकडून घेऊन परत न करण्याची वस्तू.
बाग : भेळ शेवपुरी वगैरे खाऊन कचरा टाकण्याची जागा.
चौकशीची खिडकी : इथला माणूस कुठे भेटेल हो अशी चौकशी बाजूच्या खिडकीत करावी लागणारी एक जागा.
ग्रंथपाल : वाचकाने मागितलेले पुस्तक ’ बाहेर गेले आहे ’ असे तंबाखू चघळत तिरकसपणे सांगण्यासाठी नेमलेला माणूस.
विद्यार्थी : आपल्या शिक्षकांना काहीही ज्ञान नाही असे मानून आत्मकेंद्रित राहणारा एक जीव.
कार्यालय : घरगुती ताण-तणावानंतर विश्रांती मिळण्याची हक्काची जागा
जांभई : विवाहित पुरुषांना तोंड उघडण्याची एकमेव संधी.
कपबशी : नवरा बायकोच्या भांडणात बळी जाणारी वस्तू.
कॉलेज : शाळा व लग्न या मधील वेळ घालवण्याचे मुलामुलींचे ठिकाण.
चंद्र : कवीच्या हातात सापडलेला दुर्दैवी ग्रह
अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका
मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो
शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो
सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा
वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे
लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा
फॅशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका
पासबुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव
गॅलरी - मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा
लेखणी - एकाच वेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचे साधन
छत्री - एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ
परीक्षा - ज्ञान तपासून घेण्याचे एक 'हातयंत्र'
परीक्षा - पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ
विश्वशांती - दोन महायुद्धांच्या मधला काळ
दाढी - 'कुरुपपणा' लपवण्याचे' रुबाबदार' साधन
थाप - आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात
काटकसर - कंजूषपणाचे एक 'गोंडस' नाव
नृत्य - पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला
घोरणे - नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी
मन - नेहमी चोरीस जाणारी वस्तू
ब्रह्मचर्य - कुठेच न जुळल्याने स्वीकारायचा मार्ग
विवाहित माणूस - जन्मठेपेचा कैदी
विधुर - जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी
श्रीमंत नवरा - चालतं बोलतं ATM कार्ड
श्रीमंत बायको - अचानक लागलेली लॉटरी
IT वाला - सतत काहीतरी काम करण्याचे सोंग करणारा इसम
IT वाली - श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री
बुद्धिवादी - ज्याच्या बुद्धीविषयी चारचौघात वाद आहे असा
स्कार्फ - बॉयफ्रेंड बरोबर बाईक वरून फिरताना कोणी ओळखू नये म्हणून थोबाड लपवायचे मुलींचे एक साधन
चुंबन - रेशनकार्डाशिवाय मिळणारी साखर
लग्नाचा हॉल - दोन जिवांच वेल्डिंग करणार कारखानाcouncil व्याख्यplaying e आवडल्या तर नक्की शेअर करा...