MSG

थोडे हंसून घ्या, वाचा आणि विचार करा
आयुष्याची वाटणी��

या जगाची निर्मिती करतांना परमेश्वराने आधी गाय बैल�� बनवले आणि त्यांना सांगि तले, “तुम्ही जन्मभर उन्हातान्हात कष्ट करून मानवांची सेवा करा. तुम्हाला मी साठ वर्षांचे आयुष्य देतो.”
त्यावर ते म्हणाले, “नको, आम्हाला वीस वर्षे पुरेत. चाळीस वर्षे परत घ्या.”
त्यानंतर परमेश्वराने कुत्र्याला�� बनवले आणि सांगितले, “तू मानवांच्या दारात बसून भुंकत रहा. तुला मी वीस वर्षांचे आयुष्य देतो.”
त्यावर तो म्हणाला, “नको, मला दहा वर्षे पुरेत. दहा वर्षे परत घ्या.”
त्यानंतर परमेश्वराने माकडाला�� बनवले आणि सांगितले, “तू उड्या मारून मानवांची करमणूक कर. तुला मी वीस वर्षांचे आयुष्य देतो.”
त्यावर तो म्हणाला, “नको, मला दहा वर्षे पुरेत. दहा वर्षे परत घ्या.”
��अखेर परमेश्वराने माणसाला बनवले आणि सांगितले, “तू झोपा काढून, खेळून आणि खाऊन पिऊन मजा कर. तुला मी वीस वर्षांचे आयुष्य देतो.”
त्यावर तो म्हणाला, “हे काय, मला फक्त वीस वर्षे ? या इतर प्राण्यांनी परत केलेली वर्षे पण मला द्या.”
परमेश्वर म्हणाला,”तथास्तु.”

म्हणूनच देवाने दिलेली पहिली वीस वर्षे माणूस मजेत घालवतो, त्यानंतर चाळीस वर्षे बैलासारखे काबाडकष्ट करून घरसंसार चालवतो, त्यानंतर दहा वर्षे माकडा सारखे नातवंडांचे मनोरंजन करतो आणि अखेरची दहा वर्षे कुत्र्यासारखा बसून राहतो....��������������
strange but true ������

Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

Blog Archive

Powered by Blogger.

Recent

Comment

NEXT PAGE

FOR NEXT PAGE CLICK ON OLDER POSTS.

Search This Blog