MSG

����विनोदी मराठी चारोळ्या (Vinodi Marathi Charolya)

1) मी आहेच जरा असा
एकटा एकटा राहणारा
कुणीही पितांना दिसला
कि आशेनें पाहणारा

२) सगळीच वादळं मी
खिडकीत बसुन सोसली
अन् हि बाट्ली सुध्धा
खिडकीत बसुनच ढोसली

३) घरा भोवति कुंपण नको
म्हणजे नीट आत जाता येते
बायकोनं नाहि उघडलं दार
तर पायरीवरच झोपता येते

४) पाजणारं कोणी असेल तर
प्यायला तरुण तुर्क आहोत
स्वतःच्या पैशांनी प्यायला
आम्ही काय मूर्ख आहोत?

५) नेहमीच काव्याने नशा करु नये
कधी दारूलाही वाव द्यावा,
तहानलेल्या रसिकांना
थोडी पाजुन भाव द्यावा

६) दारुडे बेहोश होउन कोसळतात
तेव्हा किंकाळी फोडत नाहित
याचा अर्थ असा नाहि की
त्यांची हाडे मोडत नाहीत

७) प्रत्येक तळीराम पितांना सांगतो
मी ‘चषक’ सोडणार आहे
चषक म्हणतो, तुझा संकल्प
मीच उद्या मोडणार आहे

तो फार सज्जन माणूस होता.
त्याने कधी सुपारीच्या खांडाचेही व्यसन केले नाही.
त्याने आयुष्यात एकही खोटा शब्द उच्चारला नाही.
त्याने परस्त्रीकडे डोळा वर करून कधीही पाहिले नाही…

… तो मरण पावला,

तेव्हा इन्शुरन्स कंपनीने क्लेम नाकारला…

ते म्हणाले, ‘जो जगलाच नाही, तो मेला कसा?!!!’

लक्षात ठेवा ....

जो एकटा पितो
तो नरकलोकात जातो
जो दोस्तांबरोबर पितो
तो स्वर्गलोकात जातो
आणि
जो पीतच नाही,
तो…

तो नक्की ‘जसलोक‘मध्ये जातो!!!
.
केवळ विनोद म्हणुन घ्या नाही तर प्यायला बसाल.

Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

Blog Archive

Powered by Blogger.

Recent

Comment

NEXT PAGE

FOR NEXT PAGE CLICK ON OLDER POSTS.

Search This Blog