MSG

___ पार्टी मीञ _________
       .  .    कवी - भालचंद्र कोळपकर
बापाची चप्पल पायात येतीय
मग तु वयात चांगला आलाय
म्हणून लक्षण रेषा ओलंडण्यास
आता तू मोकळा झालाय

मीञांचा गोतावळा थोडा थोडा
वाढत रहाणार
घराचा उंबराही हळूहळू तू
सोडत जाणार �

सिक्रेट देण्याघेण्यासाठी निवांत
बसावं ला�गेल
आणि कधीतरी मीञांच्या आग्रहात
फसावं लागेल

गंमत म्हणून धुरांच्या गाड्या
हवेत सुटतील
हिंमत देत मीञही लाईटर वाले
नवेच भेटतील

असच कधीतरी हातात रंगीत ग्लास
सुद्धा येतील
सुरुवात बीअरने करुन नंतर सल्ला
दारूचा देतील

वास येत असेल तर नाक
दाबुन पी
एकदम न घेता घोट घोट
थांबून पी

कडवटपणा जाण्यासाठी सॉफ्ट ड्रिंक
टाकून पी
ठसका लागला तर थोडी थोडी
वाकून पी

जास्तच चढल्यावर रात्री घरात
उशीरा जा
कुणाला वास येवू नाही म्हणून
पुदिना खा

मैत्रीचा दाखला देत तुला घरापर्यंत   .
सोडतील
तुझ्या साठी एखाद्याचं तंगडही
मोडतील

दोन तिन वेळेस मीञच
आग्रहाने पाजतील
चौथ्या वेळेस मात्र तुलाच
हक्काने मागतील

घराच्यांना कसं बनवायचं हे तर
सहज शिकवतील
एखादी चोरलेली वस्तु बिन बोभाट
लगेच विकवतील

मग प्रत्येक विकएन्डला ठरेल
एकाएकाची पार्टी
पार्टीत आण म्हणतील
एखादी कार्टी

पैसाचं कारण तू त्यांच्यापुढे
मांडणार
ते सांगतील तस तू आईबापाला
भांडणार

तुझी बनवेगीरी प्रेमाआड खरीच
वाटून राहील
खरं कळल्यावर मात्र त्यांच काळीज
फाटून जाईल

तोपर्यंत तुझं मन ठार
मेलेले असणार
माणूसकी सोडण्याची सिमा पार
केलेले असणार

खिसा गरंम असेपर्यंत मीञांची
साथ असेल
तुझा झरा आटल्यावर त्यांचीच
लाथ बसेल

शेवटी एकटाच देशी नाहीतर 
हातभट्टी पेशील
नातेवाईका� बरोबर जगण्यालाही
सोडचिट्टी देशील

मग मात्र आईबापच पुन्हा
धावून येतील
किडण्या बदलण्यासाठी तुला
घेऊन जातील

म्हणून पार्टीतील मीञांची खबरदारी
खरंच आतापासुन घे
मैत्री करण्यापुर्वी त्यांची कुंडली
संपूर्ण तपासून घे

अरे आत्ताच कुठे तू अठरा वर्षाचा
झालाय
८०% जीवन प्रवास अजून बेरजेचा
राहिलाय
____ कवी - भालचंद्र कोळपकर
               नान्नज ( जामखेड ) अ'नगर
              ९९२२७६०१२५
( क्रुपया आवडल्यास कवीच्या नावासह
फॉर्वर्ड करा)

Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

Blog Archive

Powered by Blogger.

Recent

Comment

NEXT PAGE

FOR NEXT PAGE CLICK ON OLDER POSTS.

Search This Blog