GOOD THOUGHT

�� चला सुखी होऊया

�� रोज दहा ते तीस मिनिटे मोकळ्या हवेत चाला आणि हो! अगदी सुहास्यवदनाने.

�� रोज किमान दहा मिनिटे स्तब्ध…शांत राहा. एका जागी! शांत!

�� रोज ७ तास शांत झोप काढा. शांत झोप…सुखाचा मूलमंत्र!

�� जगताना तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, स्फूर्ती, उत्साह आणि दिलदारी.

�� रोज थोडे तरी खेळा. मनोविनोदन होईल.

�� गेल्या वर्षापेक्षा मी थोडीतरी अधिक पुस्तके वाचीन असा निश्चय करा.

�� खूप मुबलक पाणी प्या. पाणी म्हणजे जीवन!

�� फळे, फळभाज्या, पालेभाज्या असे शेतातले, बागेतले, डोंगरावरले पदार्थ रोज पोटात जाऊ देत. थोडे समुद्रातलेही! तन सुखी तो मन सुखी!

�� जरूर लक्षात घ्या की सकाळचा नाश्ता राजासारखा, जेवण राजकुमारासारखे नि रात्रीचे जेवण मात्र भिकाऱ्यासारखे असावे! म्हणजे काय राव? नाश्ता दमदमीत. दुपारची जेवण राजस; पण रात्रीचे जेवण मात्र अगदी अगदी थोडे, पुरते तेवढेच. कारण झोपेत कुठलीच शारीरिक हालचाल नसते.

�� रोज ध्यानधरणा करा. प्रार्थना करा. आपल्या धावपळीच्या, दगदगीच्या जीवनांत तेच एक इंधन आहे जे सुख-शांती-समाधान देईल.

�� जागेपणी स्वप्न बघा. त्याचा ध्यास घ्या. त्यांच्या पूर्तीसाठी प्रयत्न करा.

�� खूप आनंदी राहा. हसून खेळून, मिळून मिसळून! आप चंगा… तो जग चंगा.

�� एक नियमच करून टाका. रोज मी किमान तीन लोकांच्या ओठांवर स्मितहास्य फुलवेन.

�� आपले चैतन्य, आपली बहुमोल ऊर्जा लोकांबद्दल वायफळ बोलण्यात, त्यांची कुचेष्टा करण्यात वाया घालवू नका.

�� ज्या गोष्टी आपल्या अखत्यारित नाहीत, ज्या परिस्थितीस तुम्ही बदलू शकत नाही त्याबद्दल दुःख करीत बसू नका. त्यापेक्षा माझे वर्तमान कसे सुधारता येईल, ते पहा.

�� ७० वर्षांवरील वृद्ध माणसे आणि ६ वर्षांखालील छोटी मुले यांच्यासमवेत दिवसातील थोडातरी वेळ नियमित घालवा. वृद्धांना जगण्याची उमेद द्याल नि छोट्यांकडून ऊर्जा घ्याल!

�� हे जीवन फार छोटे आहे. दुसऱ्याचा हेवा, मत्सर, द्वेष करण्याइतके खचितच मोठे नाही.

�� स्वतःचा फार गंभीरपणे विचार करू नका. इतरांना तुमची काही पडलेली नाही. ते तुमचा इतका विचार अजिबात करीत नाहीत.

�� भूतकाळातील अप्रिय घटना विसरून जा. आपल्या जोडीदाराला त्याच्या भूतकाळातील चुकांसाठी टोकणे, चटकन लागेलसे बोलणे, टोचत राहणे सोडून द्या. त्यामुळे आपला जोडीदार पुन्हा पुन्हा दुखावला जाईल आणि आपले वर्तमान बिघडेल. त्याचे काय हो! सो? लॉक द पास्ट, एन्जॉय द प्रेझेंट!

�� रोज विद्यार्थी शाळेत जातात. जीवन ही आपली शाळा समजा. एनी प्रॉब्लेम? अहो तो बीजगणिताचा तास समजा. एखादा प्रॉब्लेम नाही सुटला तरी तास संपतो! संपते ना? पण त्यातून आपण काहीतरी धडा शिकतोच! तसेच जीवन आहे. काही समस्या सुटत नाहीत; पण त्यातून मिळालेल्या धड्याने आपण शहाणे होतो हेही नसे थोडके!

��प्रत्येक वेळी तुम्हीच कसे जिंकणार? इतरांनाही थोडी संधी द्या .

�� दुसऱ्याच्या आयुष्याशी आपली तुलना नको. त्याचे वरवरचे सुखविलास पाहून मत्सरग्रस्त होऊ नका. तो आतून काय 'भोगतोय', काय 'सोसतोय' ते तुम्हास कोठे ठाऊक आहे?

�� क्षमाशस्त्र ज्याचे हाती त्यास काय तोटा? आनंदाच्या वाटा शोधा आनंदाच्या वाटा!…क्षमाशील झालात की सुखाची रांगोळी आपल्याच दारात!…

�� दुःखाचे, तणावाचे दिवस आहेत? संपतील राजा! परिस्थिती कायम बदलत राहाते. लाल सिग्नल नंतर हिरवा येतोच की!

�� तुमच्या आयुष्यातला सर्वोत्तम काळ अजून यायचा आहे! हे धरा मनी. पहा… कसे आशादायी नि प्रसन्न वाटेल.

�� तुमचे कुटुंब तुमचा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. त्यांना प्राधान्य द्या.

�� काय वाटेल तो पसंग येवो! धैर्य सोडू नका. उठा, उत्तम वेश परिधान करा व धैर्यांने जगास सामोरे जा.

�� तुमचा आत्मा सुखी आहे! मग तुम्ही दुःखी? का? कशासाठी? सुखी राहा, आनंदी रहा.

�� हे सारं आवडलं ना? मग आपल्या आवडत्या मित्रांना कळवा जरूर! मला हा सुखाचा संदेश माझ्या आवडत्या मित्रानेच पाठवलाय,जो मी माझ्याआवडत्या मित्रां पर्यंत पोहोचविलेला आहे..
बी हॅप्पी!  .

Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

Blog Archive

Powered by Blogger.

Recent

Comment

NEXT PAGE

FOR NEXT PAGE CLICK ON OLDER POSTS.

Search This Blog