MSG
गावातल्या आडावर ४ बायका पाणी भरत होत्या. त्यातल्या एकीचा मुलगा तिथुन निघाला होता, तर त्याला पाहुन ती म्हणाली, तो बघा माझा मुलगा सगळ्यात मोठा पहलवान आहे.
पुन्हा दुसरीचा मुलगा तिथुन निघाला तर त्याला पाहुन ती पण म्हणाली तो बघा माझा मुलगा सगळ्यात मोठा विद्वान आहे.
त्यानंतर तिसरीचा मुलगा तिथुन निघाला होता तर त्याला पाहुन त्याची आई म्हणाली तो बघा माझा मुलगा सगळ्यात मोठा व्यापारी आहे.
तेवढ्यात चौथीचा मुलगा तिथुन निघाला असता त्याने आपल्या आईला पाहीले व जवळ आला
पाण्याची कळशी खांदयावर घेतली नि म्हणाला आई चल घरी.
त्या आईच्या चेहर्यावरील आनंद पाहुन बाकी तिघिंच्या नजरा खाली गेल्या.
त्या समजुन गेल्या की खरा मुलगा कोण आहे.
0 comments:
Post a Comment