NILA WADAL
आज म्हणजेच 5 फेब्रुवारी 1951 ला विश्वरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यानी कठोर अविरत परिश्रम करून हिंदु कोड बील लीहले होते तेच हिंदु कोड बील संसदेत मांडले होते.
भारत हा स्वतंत्र झाला होता पण भारतीय स्ञी ही गुलामगीरीत जिवन जगत होती.
येथील महिला वर्गावर हिंदु धर्माने म्हणजेच वैदिक धर्माने ब्राह्मणानी स्ञी वर्गावर आनेक बंधन, त्यांच्या वर सती ची चाल, बालविवाह, आशा अनिष्ट प्रथा अत्यंत चालाखीने बनवुन स्ञीयांना संपत्ती मधून हद्दपार करण्यात आले होते,
महिलांना शिक्षणाचा आधिकार नाकारण्यात आला होता.
या गोष्टी स्पष्ट करताना काही मुद्दे संदर्भा सहीत खाली लिहीत आहे,
अथर्व वेद - या अथर्व वेदात सांगितल्या प्रमाणे "हे परमेश्वरा तु हा गर्भ बनवला आहेस, त्यतुन मुलाचा जन्म होवू दे.स्ञी काय कुठेही जन्माला येइल,.(श्लोक 6-11-3-)
याच अथर्व वेदात पुढे 2-3-23 या श्लोकात "हे वरा तु पुरुष जन्माला घाल.
शतपथ पुराणा-"मुलाला जन्म न देवु शकणारी स्ञी ही आत्यांत
दुर्दैवी आसते"
याच पुराणात पुढे म्हटले आहे कि "स्ञी, कुञा, कावळा, आणी शुद्र यांच्या त पाप असत्या आणी आज्ञान वाढत असते"
रिग वेद -या रिग वेदातील 10-95-15 या श्लोकात " स्ञी सोबत मैत्री करू नका, स्ञी ही कपटी असते.
याच रिग वेदातील 8-33-17 श्लोक" इंद्र म्हणाला:स्ञीयांना उपजतच कमी बुद्धी आसते,
ती ज्ञान ग्रहन करु शकत नाही.
युजर वेद- या वेदात 6-5-8-2 या श्लोकात स्ञीला कार्यशक्ती नसते म्हणून स्ञी ला संपत्ती त हिस्सा देवू नये,
मनुस्र्मृतीत तर भृगु ने आत्यांत घानेरडे लिखाण केले ले होते. भृगु ञिश्ना 9-93 या श्लोकात भृगु म्हणतो की "कोणत्याही धार्मिक परंपरेतील समस्या आसतील तर 24-30 वयाच्या पुरुषाने 8-12 वयाच्या मुली सोबत लग्न करावे,
पुढे 9-77 या श्लोकात " बेकार नशेबाज बिनकामी रोगी नवर्याची जी स्ञी आज्ञा पाळत नाही तीला तीन महिने अंगावरील दागिणे काढून घेऊन जंगलात सोडावे"
भारतीय परंपरेने स्ञी ला जोखडान ठेवले,
जन्म झाला कि बालवयात वडीलांच्या आज्ञेत रहायचे,
तरुण वयात लग्न झाले की नवर्याच्या आज्ञेत आणि वृद्धा अवस्थेत आपल्या मुलांच्या अधिपत्याखाली रहायचे.
म्हणजे स्ञीयांचे अस्तित्व च भारतीय परंपरेने म्हणजे च वैदिक धर्माने म्हणजे हिंदु धर्माने नाकरले होते.
म्हणूनच स्ञी वर्गाच्या भल्याचा विचार करून 1947 पासून 4 वर्षे 1महिना 26 दिवस अविरत कष्ट करून बाबांनी हिंदु कोड बील लिहले.
या हिंदु कोड बीलाच्या माध्यमातुन येथील स्ञी वर्गाला समान हक्क, योग्या दर्जा आणी त्यांची प्रतिष्ठा भारतीय स्ञी ला मीळावी या उद्देशाने बाबासाहेबांनी हिंदु कोड बील लिहले.
हे बिल सात
वेगवेगळ्या घटकांशी निगडित कायद्याचे
कलमात रूपांतर करू पाहणारे होते. हे सात घटक
खालीलप्रमाणे-
१. जी व्यक्ती मृत्युपत्र न करता मृत
पावली असेल अशा मृत हिंदू
व्यक्तीच्या (स्त्री आणि पुरुष दोघांच्याही)
मालमत्तेच्या हक्कांबाबत.
२. मृताचा वारसदार ठरवण्याचा अधिकार
३. पोटगी
४. विवाह
५ . घटस्फोट
६. दत्तकविधान
७. अज्ञानत्व व पालकत्व.
हे सातही विषय स्त्रियांच्या दृष्टीने
किती महत्त्वाचे आहेत हे वेगळे
सांगायला नकोच !
परंतु या हिंदु कोड बीलाला येथील सनातनी लोकांनी प्रचंड विरोध दर्शवला.
राजेंन्द्र प्रसाद, वल्लबभाई पटेल, मदन मोहन मालविया यानी RSS शी संगनमत करुन हिंदु कोड बीलाला विरोध केला.
हिंदु कोड बील हे महिलांच्या साठी होते.
बाबासाहेबानी ज्या स्ञी साठी इतकी मेहनत घेऊन हिंदु कोड बील लिहले त्याचाच विरोध कमी बुद्धी असलेल्या सरोजीनी नायडु हीने केला .
एक अस्पृष्य हिंदु धर्मावर भाष्य करत आहे,देशद्रोही , हिंदु धर्माचे शञु आशा
अत्यंत घृणास्पद प्रतीक्रिया देत मोर्चे काढले.
प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरु ने सामाजिक दबावाचे राजकारण करून हिंदु कोड बील बरखास्त केले.
परंतु बाबासाहेब आंबेडकर हे थांबले नाही.
त्या वेळ च्या प्रबुद्ध वर्गातील लोकांना या बिलाच्या पाठीशी राहण्याचे अवाहन केले परंतु कोणही पाठीशी भक्कम पणे ऊभे राहु शकले नाहीत.
बाबासाहेब आंबेडकर यानी भारतीय संविधान लिहिताना संविधानात ज्या तत्वांचा , मुल्यें चा पुरस्कार केला त्याच तत्वाना मुठमाती देन बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या महापुरुषाला शक्य नव्हते म्हणून बाबासाहेबानी कायदे मंञीपदावर लाथ मारली व कायदे मंञीपदाचा राजीनामा 21 सप्टेंबर 1951 ला तत्कालीन प्रधान मंत्री जवाहरलाल नेहरु यांच्या थोबाडावर फेकला..
त्या च वेळी जर हे विधेयक पास झाले असते तर खरंच भारत हा जगात महासत्ता म्हणून राहिला आसता.
बाबासाहेबांशी वैचारिक
मतभेद असलेले आचार्य अत्रे
म्हणतात…
आंबेडकरांचे ‘हिंदू कोड बिल’ जर मान्य झाले
असते, तर हिंदु समाजातील सर्व भेद, अन्याय
आणि विषमता नष्ट होऊन हिंदु समाज
हा अत्यंत
तेजस्वी आणि बलशाली झाला असता.
आणि भारताच्या पाच हजार
वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत
कुणी घडवून आणली नाही ती घडून
आली असती. पण दुदैव भारताचे! दुर्भांग्य
हिंदुसमाजाचे! देवासारखा आंबेडकरांनी पुढे
केलेला हात
त्यांनी झिडकारला आणि स्वतःचा घात
करुन घेतला.
डॉ बाबासाहेब
आंबेडकरांनी सर्व भारतीय
महिलांवर जे उपकाराचे कर्ज केले
आहे त्याचे व्याज मरेपर्यंत न
फिटणारे आहे. यांची जाणीव
महिलांनी ठेवली पाहीजे. .
जय भीम
0 comments:
Post a Comment